Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood: ‘लोक ३०० किमीपर्यंत वाहून गेले..’, नेपाळच्या महापुरातून बचावली अभिनेत्री, सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Nepal Flood: कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान नेपाळच्या महापुरात अडकलेल्या मानसी पारेखने भयावह अनुभव सांगितला. ‘संपूर्ण गाव वाहून गेलं, लोक ३०० किमीपर्यंत वाहून गेले’, असं तिने सांगितलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 31, 2026 | 01:29 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Nepal Flood: नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकजण बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. पुरामुळे नेपाळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच महापुराच्या संकटात अभिनेत्री मानसी पारेखही अडकली होती. मात्र, सुदैवाने ती सुखरूप भारतात परतली आहे. नेपाळमधील या भयावह अनुभवाबद्दल मानसीने आता भाष्य केलं असून, तिने सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मानसी पारेख कैलास मानसरोवर यात्रा करून सुखरूप मुंबईत दाखल झाली आहे. यात्रेदरम्यान नेपाळमध्ये ती बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्याने तिच्या कुटुंबीयांसह चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, आता मानसी सुखरूप मुंबईत परतली आहे.

मानसी पारेख ही ईशा फाऊंडेशनच्या ९३ सदस्यांच्या समूहासोबत भारतात परतली. मुंबई विमानतळावर पोहोचताच तिच्या कुटुंबीयांनी तिला पाहून सुटकेचा नि:श्वास सोडला. कुटुंबीय आणि मानसी यांच्यातील भावूक भेटीचा क्षणही पाहायला मिळाला.

‘ती एवढी मोठी बिल्डिंगही वाहून गेली’

‘इंडिया टीव्ही’शी संवाद साधताना मानसी पारेखने कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान आलेल्या कठीण प्रसंगाबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, हा प्रवास खूप लांब आणि कठीण होता.

तिने सांगितलं, “तिबेट आणि नेपाळच्या सीमेवर एक भलीमोठी इमिग्रेशन बिल्डिंग आहे. सात दिवसांपूर्वीच आम्ही याच बिल्डिंगमधून चीनमध्ये प्रवेश केला होता.”

पुढे बोलताना मानसीने सांगितलं की, कैलास यात्रा संपल्यानंतर ते लगेच चीनमधून बाहेर पडणार होते. मात्र, त्याच्या अवघ्या २४ तास आधी नेपाळमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली.

kiara advani: ‘टॉक्सिक’नंतर कियारा अडवाणीला मिळणार आणखी मोठी संधी? करीना कपूरच्या १० वर्षे जुन्या सिनेमाच्या सीक्वलमध्ये झळकणार?

‘२४ तासांत संपूर्ण गाव नाहीसं झालं’

मानसीने या आपत्तीची भीषणता सांगताना म्हटलं की, घटनांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना काहीच सुचत नव्हतं. एवढी मोठी इमारतही पुराच्या पाण्यात वाहून गेली. इतकंच नाही तर संपूर्ण गावच वाहून गेल्याचं तिने सांगितलं.

“२४ तासांत संपूर्ण गाव नाहीसं झालं होतं. तो आमच्यासाठी खूप वाईट अनुभव होता. त्यावेळी जाणवलं की आयुष्यात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. आयुष्य खूप अनिश्चित आहे,” असं मानसीने सांगितलं.

‘लोक ३०० किलोमीटरपर्यंत वाहून गेले’

पूरग्रस्त परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे बचावकार्य आणि बेपत्ता लोकांचा शोध घेणं अत्यंत कठीण झाल्याचंही मानसीने सांगितलं.

पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की काही लोक तब्बल ३०० किलोमीटरपर्यंत वाहून गेल्याचं तिने नमूद केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर येईल, याची कोणालाही कल्पना नव्हती. ही एक नैसर्गिक आपत्ती असून ती कोणीही टाळू शकत नाही, असंही मानसीने म्हटलं.

“हा एक अविश्वसनीय अनुभव होता. हे खूप दु:खद आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

OTT Release: सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घरबसल्या पाहता येणार नवे सिनेमे-सीरिज; पाहा संपूर्ण यादी

बेपत्ता असल्याच्या वृत्ताने वाढली होती चिंता

कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान मानसी पारेख बेपत्ता असल्याच्या वृत्तामुळे तिचे कुटुंबीय, मित्र आणि चाहते चिंतेत होते. तिच्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली. नेपाळमधील दुर्घटनेच्या काही तास आधी मानसीने सोशल मीडियावर आपल्या मानसरोवर यात्रेतील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.

दरम्यान, मानसी सुखरूप भारतात परतल्याने तिच्या कुटुंबीयांसह चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या यात्रेदरम्यान तिने अनुभवलेली नेपाळमधील महापुराची भीषणता तिच्या मनावर कायमची कोरली गेली आहे.

Web Title: Nepal flood manasi parekh kailash mansarovar yatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Nepal Flood

संबंधित बातम्या

Nepal Flood Viral House: महापुराचा कहर, पण ‘हे’ घर ठाम! आजूबाजूचं सगळं वाहून गेलं तरी घराला धक्का नाही; VIDEO व्हायरल
1

Nepal Flood Viral House: महापुराचा कहर, पण ‘हे’ घर ठाम! आजूबाजूचं सगळं वाहून गेलं तरी घराला धक्का नाही; VIDEO व्हायरल

Nepal Flash Flood: ‘चीनने ग्लेशियरची योग्य माहिती दिली नाही…’, नेपाळचा चीनवर आरोप
2

Nepal Flash Flood: ‘चीनने ग्लेशियरची योग्य माहिती दिली नाही…’, नेपाळचा चीनवर आरोप

Nepal Flood: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 60 पर्यटक बेपत्ता; कैलास यात्रेतील भाविकांचा अद्याप शोध नाही, शोधकार्य सुरुच…
3

Nepal Flood: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 60 पर्यटक बेपत्ता; कैलास यात्रेतील भाविकांचा अद्याप शोध नाही, शोधकार्य सुरुच…

Nepal Power Crisis : महापुरानंतर नेपाळमध्ये भीषण वीज संकट! भारताकडे मागितली मदत; पुरवठ्याबाबत केंद्र सरकारची भूमिका काय?
4

Nepal Power Crisis : महापुरानंतर नेपाळमध्ये भीषण वीज संकट! भारताकडे मागितली मदत; पुरवठ्याबाबत केंद्र सरकारची भूमिका काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.