Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 60 पर्यटक बेपत्ता; कैलास यात्रेतील भाविकांचा अद्याप शोध नाही, शोधकार्य सुरुच…

नेपाळ-चीन सीमेजवळील भीषण पूर आणि ढिगाऱ्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे 60 पर्यटकांशी संपर्क तुटला आहे. हे पर्यटक कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. दरम्यान, 37 भाविक सुखरूप मुंबईत परतले असून बचावकार्य सुरू आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 30, 2026 | 09:58 PM
Nepal Flood: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 60 पर्यटक बेपत्ता; कैलास यात्रेतील भाविकांचा अद्याप शोध नाही, शोधकार्य सुरुच...

Nepal Flood: नेपाळमध्ये महाराष्ट्रातील 60 पर्यटक बेपत्ता; कैलास यात्रेतील भाविकांचा अद्याप शोध नाही, शोधकार्य सुरुच...

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील 60 पर्यटक अद्याप बेपत्ता; शोधकार्य सुरू.
  • कैलास मानसरोवर यात्रेतील भाविकांशी संपर्क तुटल्याने कुटुंबीय चिंतेत.
  • 37 महाराष्ट्रातील भाविक सुखरूप मुंबईत परतले.
 

Nepal Flood: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत चिंता वाढली आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे 60 पर्यटकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. या पर्यटकांमध्ये मुंबईतील नागरिकांची संख्या मोठी असल्याचं समोर आलं आहे. मात्र, या सर्वांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

नेपाळ-चीन सीमेजवळील भागात आलेल्या भीषण पुरामुळे रस्ते, इमारती आणि सीमा परिसरातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे बेपत्ता पर्यटकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्याशी संपर्क साधणं बचाव पथकांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल आणि दगडांचा ढिगारा साचल्याने शोधमोहीमही अडचणीत आली आहे.

कैलास मानसरोवर यात्रेतील पर्यटक बेपत्ता

महाराष्ट्रातील बेपत्ता नागरिकांपैकी मोठा गट कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेला होता. मुंबईतील ट्रॅव्हल ऑपरेटरमार्फत हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या गटातील अनेक पर्यटकांशी पूरस्थितीनंतर संपर्क तुटला.

Rain Update : देशातील 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात…

राज्याच्या आपत्कालीन यंत्रणेकडून संबंधित पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्रातील 395 नागरिक नेपाळमध्ये असल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी अनेक जण सुरक्षित असल्याचं निश्चित झालं असून सुमारे 60 जण अद्याप अनट्रेस्ड आहेत.

37 भाविक सुखरूप मुंबईत परतले

दरम्यान, कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या महाराष्ट्रातील 37 भाविकांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात यश आलं आहे. हे भाविक शनिवारी मुंबईत दाखल झाले. नेपाळमधील पूरस्थितीतून बचावल्यानंतर मुंबईत परतलेल्या या भाविकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

याशिवाय महाराष्ट्रातील आणखी अनेक नागरिकांशी संपर्क साधण्यात आला असून त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेनेचा मदत कक्ष सक्रिय

नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडूनही मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. काठमांडूमध्ये मदत कक्षाच्या माध्यमातून अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत केली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Nepal Flood : नेपाळ-तिबेटमध्ये महापुराचा हाहाकार; मृतांचा आकडा 750 वर, 3 हजारांहून अधिक बेपत्ता

दरम्यान, नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या या आपत्तीमुळे हजारो नागरिक आणि पर्यटक प्रभावित झाले आहेत. हिमालयीन भागातील खराब हवामान, उद्ध्वस्त रस्ते आणि मोठ्या प्रमाणातील चिखल-ढिगाऱ्यामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बेपत्ता पर्यटकांच्या कुटुंबीयांकडून प्रशासनाकडे सतत संपर्क साधला जात असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिकृत माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या 60 पर्यटकांचा शोध आणि त्यांच्या स्थितीबाबत पुढील अधिकृत अपडेटकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Nepal flood 60 maharashtra tourists missing kailash mansarovar yatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • Mumbai News
  • nepal
  • Nepal Flood

संबंधित बातम्या

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा
1

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
2

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात DYFI आणि SFI चे आंदोलन; ‘वोट चोरी’चा आरोप
3

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात DYFI आणि SFI चे आंदोलन; ‘वोट चोरी’चा आरोप

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार
4

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.