
नेपाळने केले चीनवर आरोप (फोटो सौजन्य - Social Media)
तीन महिन्यांनंतर, २६ ऑगस्ट रोजी, नेपाळ-तिबेट सीमेवर एक हिमनदी फुटल्याने महापूर आला. रोज नवे नवे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. या दुर्घटनेनंतर, दोन्ही देशांमधील आपत्ती-संबंधित माहितीच्या देवाणघेवाणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेपाळला संपूर्ण माहिती न मिळाल्याची तक्रार आहे, तर चीनने वेळेवर सर्व माहिती दिल्याचे म्हटले आहे.
Nepal Flood : नेपाळ-तिबेटमध्ये महापुराचा हाहा:कार; मृतांचा आकडा 750 वर, 3 हजारांहून अधिक बेपत्ता
नेपाळचे म्हणणे आहे की, वेळेवर तयारी करता यावी यासाठी त्यांनी चीनकडून हिमनदीची हालचाल, नदीची पातळी आणि मुसळधार पाऊस यासंबंधी महत्त्वपूर्ण माहितीची विनंती केली होती. तथापि, त्यांना अपेक्षेइतकी माहिती मिळाली नाही.
नेपाळच्या जलविज्ञान विभागाचे म्हणणे आहे की, चीन केवळ मुसळधार पावसाचा अंदाज पाठवतो, तर जीव वाचवण्यासाठी नेपाळला हिमनदी फुटणे, भूस्खलन आणि पाण्याच्या पातळीबद्दल दर १० मिनिटांनी अचूक माहितीची आवश्यकता आहे. दरम्यान ही माहिती लवकर देण्यात आली नाही असा आरोप आता नेपाळने केली आहे. नेपाळला आता भारतासोबतच्या करारासारखाच एक करार चीनसोबत करायचा आहे, ज्याअंतर्गत नदी आणि हवामानाची माहिती सातत्याने आणि नियमितपणे दिली जाईल.
चीनने नेपाळचा दावा फेटाळला. चीनने नेपाळचे आरोप फेटाळले असून, आवश्यक माहिती वेळेवर दिल्याचे म्हटले आहे. चिनी दूतावासाच्या मते, हा हिमालयीन सीमावर्ती प्रदेश अत्यंत दुर्गम आहे, ज्यामुळे तेथे देखरेख ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. चीनचे म्हणणे आहे की, त्यांच्या हवामान केंद्राने अपघाताच्या १२ दिवस आधी नेपाळला मुसळधार पाऊस आणि भूस्खलनासारख्या आपत्तींबद्दल सतर्क करणारा ईमेल पाठवला होता. तसंच ग्लेशियरच्या बाबतीतही इशारा दिला होता असं सांगितलं होतं.