Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gharo Ghari Matichya Chuli : नानांच्या मृत्युपत्रामागचा तिढा कसा सुटणार? रणदिवेंच्या घरात पुन्हा एकदा नवं वादळ

सगळं काही स्थिर स्थावर होणार तेच पुन्हा नव्या संकटाने दार ठोठावलं. ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र यांची एकुलती एक बहिण शरयुच्या रुपानं. हे कमी होतं तेच आता घराचा आधारस्तंभ नाना हे जग सोडून गेल्याचा प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 16, 2026 | 03:04 PM
Gharo Ghari Matichya Chuli : नानांच्या मृत्युपत्रामागचा तिढा कसा सुटणार? रणदिवेंच्या घरात पुन्हा एकदा नवं वादळ
Follow Us
Follow Us:
  • नानांच्या मृत्युपत्रामागचा तिढा कसा सुटणार?
  • रणदिवेंच्या घरात पुन्हा एकदा नवं वादळ
Gharo Ghari Matichya Chuli  Serial New Twist : स्टर प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आता पुन्हा नवं वादळ रणदिवेंच्या कुटुंबात धडकलं आहे. मायाच्या रुपाने रणदिवेंच्या घरावर संकटांची मालिका सुरु झाली होती. ही मालिका थांबता थांबायचं नाव देखील घेत नव्हती. अखेर रणदिवेंच्या एकीमुळे मायाचा बिमोड झाला. जी कुटुंबाचा खास करुन जानकीचा राग राग करत होती ती ऐश्वर्या देखील आता कुटुंबाचा एक भाग झाली. आता कुठे सगळं काही स्थिर स्थावर होणार तेच पुन्हा नव्या संकटाने दार ठोठावलं. ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र यांची एकुलती एक बहिण शरयुच्या रुपानं. हे कमी होतं तेच आता घराचा आधारस्तंभ नाना हे जग सोडून गेल्याचा प्रोमो वाहिनीने शेअर केला आहे.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आता सगळ्यात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.या प्रोमोनुसार नाना हे जग सोडून गेले असं दाखवण्यात आलं आहे. नानांना फोटोला हार घालणयात आला. त्यावेळी संपूर्ण रणदिवे कुटुंब तिथे उपस्थित होतं. यावेळी नानांच्या मृत्यूपत्राची देखील चर्चा झाली. त्यावेळी तिथे असलेल्या एका वकिलाने सांगितलं की, नानांनी घर, सगळ्या इनवेस्टमेंट आणि शेती हे सगळं जानकी रणदिवे यांच्या नावावर केलं आहे. त्यात नानांनी असं देखील म्हटलं की ही सगळी संपत्ती जानकी कोणाच्या ही नवावर करु शकत नाही. हे सगळं ऐकून घरच्य़ांना खूप मोठा धक्का बसतो. प्रॉपर्टीचा हिस्सा आपल्याला मिळावा यासाठी आलेली शर्वरी नानांचं मृत्यूपत्राचं वाचन ऐकून रागावते. संतापलेली शरयु कुटुंबातील प्रत्येकाला जानकीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करते.

Tharala Tar Mag : सायलीच तन्वी असल्याचं सत्य होणार का उघड? ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट

शरयु म्हणते की मान्य आहे की, जानकी वहिनीने घरासाठी खूप काही केलं पण सगळी प्रॉपर्टी तिच्याच नावे का ? नानांनी प्रॉपर्टीचा एकही हिस्सा आईच्या नावे का नाही ठेवला ? हे मृत्यूपत्र खरंच नानांनी लिहिलं की कोणी स्वत:च्य़ा स्वार्थासाठी डाव खेळत आहे असा सवाल करत तिने घरच्यांच्या मनात जानकी विषयी विष पेरायवला सुरुवात केली. मालिकेचा हा भाग प्रेक्षकांना 24आणि 25 मे रोजी पाहता येणार आहे. आता या सगळ्या संकटातून जानकी घराला कसं वाचवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Raja Shivaji Movie : बस काही पाऊले आणखीन! सैराटचा Record तुटणार का? 14 दिवसांचे Box Office Collection

Web Title: New twist in the gharo ghari mati chuli star pravah serial nana of the ranadive family passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Entertainement News
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण
1

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’  ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
2

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’ ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत
3

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक
4

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.