फोटो सौजन्य : स्टार प्रवाह इन्स्टाग्राम
Tharala Tar Mag Serial New Promo : स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबियांनी तिला घराबाहेर हाकलून दिलं. प्रियाने आजवर म्हणजेच गेले तीन वर्ष किल्लेदार कुटुंबियांना तन्वी असल्याचं सांगून फसवत राहिली. रविराज किल्लेदारची मुलगी असल्याचं खोट सांगत तिला किल्लेदारांची संपत्ती पाहिजे होती. त्यासाठी प्रियाने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. स्वत:चं सत्य बाहेर पडू नये म्हणून अनेकांचा खून केला. हीच प्रिया तन्वी नाही हे अर्जुन आणि सायलीने किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबियांसमोर पुराव्यानिशी सिद्ध केलं.
फसवणूक आणि खूनाच्या आरोपाखाली प्रियाला पोलीस कोठडी होते. या सगळ्यात अन्नपुर्णा आजीला सर्वात मोठा धक्का बसतो. प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर अन्नपुर्णा आजी काहीच बोलत नाही. ती सायलीला तन्वी समजायला लागते. घरातले सगळे अन्नपुर्णा आजीला समजावतात की ही सायली आहे तन्वी नाही पण तिला कोणाचं समजावणं मान्य नसतं. अन्नपुर्णा आजीची तब्येत पाहता तिला कोणी समजून सांगण्यापेक्षा समजून घेणं जास्त महत्वाचं आहे असं अश्विन सगळ्यांना सांगतो. तो म्हणतो की, सायली वहिनीने काही दिवस तन्वी असल्याचं नाटक अन्नपुर्णा आजीसमोर सुरु ठेवावं जोपर्यंत ती बरी होत नाही. याबाबत आता एक प्रोमो समोर आलेला आहे.
मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार, अन्नपुर्णा आजी तन्वीच्या लहानपणीचं आवडीचं गाणं गाते. आणि त्या गाण्यातले काही शब्द ती चुकीचे गाणे. त्यावेळी अन्नपुर्णा आजी म्हणते की, बघ तू लहान असाताना सुद्धा हेच शब्द चुकीचे म्हणायचीस. त्यावेळी अर्जुन, सायली सगळेच आश्चर्यचकित होतात. कोणाला काहीच कळत नाही की हे नेमकं काय सुरु आहे. सायलीला देखील प्रश्न पडतो की, माझ्याबरोबर हे नक्की काय होतंय कारण तिला लहानपणीचं अंधूक काहीतरी आवठत असतं. प्रिया जशी खोटी तन्वी असल्याचं अर्जुन सायलीने सिद्ध केलं तसंच सायलीच खरी तन्वी असल्याचं देखील अर्जुन सिद्ध करु शकेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या या मालिकेने वेध घेतले असल्याने टीआरपीमध्ये देखील टॉपला ठरलं तर मग मालिकेने आपलं स्थान कायम टिकवलं आहे. सायलीच खरी तन्वी असल्याचा संशय अर्जुनला लागल्याने आता तो हे सगळं कसं सिद्ध करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
“चाळीत कैरी चोरण्याची मज्जा वेगळीच होती” योगिता चव्हाणने दिला उन्हाळाच्या आठवणींना उजाळा






