फोटो सौजन्य - Social Media
धुरंधर तसेच सिनेमाच्या दुसऱ्या भागात पाकिस्तानच्या कराचीमध्ये स्थित असलेल्या Lyari भागाचे सत्य दाखवण्यात आले आहे. तेथील Underworld ला जगासमोर आणले आहे. तेथील व्यक्तींची मानसिकता आणि विकृती जगासमोर उघडी पडली आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता नवीन सिनेमाची योजना आखली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून Lyari ची सकारात्मक बाजू जगासमोर मांडण्याचा प्रयत्न आता पाकिस्तान करणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमाची UK Asian Film Festival प्रीमियरसाठी निवड करण्यात आली आहे. सिनेमा अद्याप आलाही नाही आणि त्याने जागतिक बाजारावर ओळखही निर्माण केल्याने, Lyari ची सकारात्मक बाजू खरंच जगाला पाहायला मिळणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
सिनेमाचं नाव ‘Meri Lyari’ आहे. सिनेमा 8 मे , 2026 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. सूत्रांनुसार, सिनेमात दोन महिलांना दाखवण्यात आले आहे. त्या महिलांना Football खेळण्याचा भलताच वेड असतो, त्यासाठी ते कसे प्रयत्न करतात आणि लढतात? या सगळ्या गोष्टींचा आढावा या सिनेमात दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे. एक मात्र खरं की या सिनेमाच्या माध्यमातून Lyari ला सकारात्मक दाखवण्यामध्ये पाकिस्तान कोणतीही कमतरता सोडणार नाही.
धुरंधर आणि Lyari…
धुरंधर चित्रपटांमध्ये पाकिस्तानचे Lyari शहर दाखवण्यात आले आहे. Lyari हे पाकिस्तानचे Underworld आहे, ज्या ठिकाणी पठाण आणि बलोच वाद आधीपासून चालत आला आहे. Baloch Gangster रहमान बलोच ( Rehman Dakait) त्याच्या जीवनातील काही पैलू या सिनेमात दाखवण्यात आले आहे.






