Preity Zinta : बटवारा 1947 मधील प्रीती झिंटाची भूमिका (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
प्रीती झिंटाने नुकतच मोठया पडद्यावर पुनरागमन करून चाहत्यांना छान सरप्राईज दिलं आहे. चाहते तिच्या बॉलिवूड मध्ये परतण्याची वाट बघत असताना तिच्या नव्या भूमिकेन प्रेक्षकांना मोहित केलं आहे. रसिक प्रेक्षकांनी इतकी वाट पाहिल्यानंतर राजकुमार संतोषी यांच्या बटवारा 1947 मध्ये प्रीती ने खास भूमिका साकारली आहे. भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेत्री सनी देओलच्या सोबतीने हमीदाची भूमिका साकारून तिने अक्षरशः कमाल केली आहे.Preity Zinta
सनीसोबतचा हा तिचा तिसरा चित्रपट असून ही जोडी अजूनही तितकीच प्रभावी ठरते आणि आमिर खान निर्मित या फाळणीवरील चित्रपटात तिने पत्नीची भूमिका साकारून प्रीती कोणताही गाजावाजा न करता सहज व्यक्तिरेखेत शिरते. समीक्षक आणि प्रेक्षक तिच्या अभिनयाला योग्य, वास्तववादी आणि भावनिकदृष्ट्या भक्कम म्हणत असून काहींनी तर यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात Veer-Zaara ची आठवण झाली असेही म्हटले.
समीक्षकांनी विशेषतः तिच्या कामाचे कौतुक केले आहे. समीक्षक सांगतात ती “हमीदा म्हणून तितकीच प्रभावी” आहे तिच्या व्यक्तिरेखेतील बदल “उबदारपणा आणि सन्मानाने” शांतपणे उलगडत जाते.
फ्लॉपचा शिक्का OTTवर पुसला! ‘या’ चित्रपटाला मिळतोय जबरदस्त प्रतिसाद, नंबर 1 वर ट्रेंडिंग
प्रीतीने बॉलिवूड मध्ये काम करून बराच काळ उलटून गेला असून सनी देओल आणि शबाना आझमीसोबतच्या या देशभक्तिपर कथेत तिला पुन्हा पाहून प्रेक्षक आनंदी आहेत. चित्रपटात असलेली तिची भूमिका ही ताकदीची तर ठरेत पण ती इतकी प्रभावी ठरली की प्रेक्षक भावूक झाले आहेत.
दर IPL हंगामात पंजाब किंग्सला चीअर करण्यात ती सहसा व्यस्त असलेली प्रीती बटवारा 1947 मधून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करून गेली अस म्हणायला हरकत नाही. इंडस्ट्रीत स्पर्धा असूनही या चित्रपटाला सकारात्मक प्रसिद्धी मिळत आहे आणि त्याची सुरुवातही चांगली झाली आहे आणि प्रेक्षक या चित्रपटाशी जोडले जात आहेत यामागे तिचे योगदान नक्कीच आहे.