
Priya Bapat and Umesh Kamat New Home: घर असावं तर असं! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Priya Bapat House Photos: मराठीतली सगळ्यात जास्त आवडणारी जोडी कोणती असेल तर ती प्रिया बापट आणि उमेश कामत आहे. दोघंही भारी कलाकार तसेच ते खऱ्या आयुष्यात मस्त कपल आहेत. आता या दोघांच्या नवीन घराची सगळीकडे चर्चा चालू आहे. फोटो बघून लोक म्हणतायत, काय घर बनवलंय!
मागच्या वर्षीच दोघांनी मुंबईत स्वतःचं नवीन घर घेतलं होतं. मोठा बंगला किंवा आलिशान फ्लॅट नाही, तर त्यांच्या मनासारखं साधं, सुंदर आणि मनाला शांतता देणारं घर असल्याची माहिती मिळत आहे. या घरांची उंची 1500 स्क्वेअर फूटचं असून त्याची सजावट अशी केली आहे की, बघतचं राहवासं वाटतं. Priya Bapat and Umesh Kamat New Home:
या घरात सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे जुन्या काळात आणि आत्ता मॉडर्न लूकचा टच देणारे हे घर आहे. घरात शिरलं की किचनच्या दाराजवळ आधी काळाच्या रेलिंगसारखे उभं केलं आहे. हॉलच्या मधोमध एक मोठा सागवानी लाकडाचा खांब आहे ज्यामुळे अगदी जुन्या वाड्यासारखा लूक देत आहे. भिंतीमध्ये कपाटं बसवलेली आहेत ज्यामुळे जागा वाया जात नाही.
हॉलमधल्या कपाटाला ओपन-ग्रेन व्हेनिअर लावलंय, त्यामुळे एक रॉ आणि अस्सल लूक आला आहे. भिंती पण मशीनने नाही तर हाताने ब्रशने रंगवल्या आहेत. त्यामुळे त्याला एक वेगळाच टेक्शचर येतोय. खाली जी फरशी बसवली ती पण एकदम वेगळी आहे. राखाडी आणि पांढऱ्या सिमेंटच्या टाईल्स एका आड एक लावल्या आहेत, अगदी बुद्धिबळाच्या पटासारख्या दिसतात. घराचा मेन कलर बेज आणि ऑफ-व्हाईट आहे, पण मध्ये मध्ये लाल आणि हिरव्या रंगाचा हलकासा टच दिला, त्यामुळे घर एकदम जिवंत वाटतं.
घराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हॉलमधला झोपाळा आहे. ज्यामध्ये संध्याकाळी या झोपाळ्यावर बसलं की बाहेरून पक्ष्यांचा आवाज येतो, फुलांचा वास येतो. एकदम शांत वाटतं. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अशी शांतता मिळणं म्हणजे नशीब आहे. एक गंमत म्हणजे या घरात मोठं डायनिंग टेबलच नाही. किचनला लागूनच एक छोटा ब्रेकफास्ट काउंटर बनवलाय तिथेच दोघे बसून चहा पितात, जेवतात, गप्पा मारतात. वेगळं टेबल न ठेवल्यामुळे घर अजून मोकळं आणि मोठं वाटतं.
हे सुंदर घर डिझाईन केलंय प्रसिद्ध आर्किटेक्ट सत्यजीत पटवर्धन यांनी तयार केले आहे. त्यांनीच या घराचे फोटो आणि माहिती शेअर केली. त्यांनी सांगितलं की प्रिया आणि उमेशला असंच घर हवं होतं जे साधं असेल पण त्यात त्यांच्या बालपणीच्या आठवणी असतील.आता हे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे फिरत आहेत. लोक कमेंट करत आहेत की एवढे मोठे स्टार असून पण किती साधं घर आहे. कुठेही जास्त दिखावा नाही, सोनं-चांदी नाही. फक्त लाकूड, हाताने रंगवलेल्या भिंती आणि भरपूर उजेड.
खरं तर आजकाल सगळे इंटिरियरमध्ये इटालियन मार्बल आणि महागड्या वस्तू लावतात. पण प्रिया-उमेशने दाखवून दिलं की घर महागड्या वस्तूंनी नाही तर मनाने सुंदर बनतं. त्यांच्या घरात प्रेम आहे, आठवणी आहेत आणि शांतता आहे. म्हणूनच हे घर सगळ्यांना इतकं आवडतंय.तुम्हाला पण जर साधं पण aesthetic घर बनवायचं असेल तर या घरातून नक्की आयडिया घेता येईल.