Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Gopal Varma : ‘परीक्षेत AI टूल्सना परवानगी..’, अँटी-पेपर लीक विधेयकावर राम गोपाल वर्मांचा सरकारला मोठा सल्ला

Ram Gopal Varma : अँटी-पेपर लीक विधेयक मंजूर झाल्यानंतर राम गोपाल वर्मांनी मोदी सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत मोठा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना परीक्षेत AI टूल्स वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत AI चे पाच महत्त्वाचे फायदेही सांगितले.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 29, 2026 | 04:29 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ram Gopal Varma: नीट (NEET ) पेपरफुटी प्रकरणानंतर आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारने लोकसभेत अँटी-पेपर लीक विधेयक मंजूर केले आहे. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार कठोर पावले उचलत असताना, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी शिक्षण व्यवस्थेबाबत वेगळाच प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दोन सविस्तर पोस्ट शेअर करत पारंपरिक शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, AI मुळे शिक्षणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून, जुन्या शिक्षण पद्धतीत बदल करण्याची वेळ आली आहे.

त्यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्या पाठांतरावर नव्हे, तर AI चा वेगाने आणि सर्जनशीलतेने वापर करण्याच्या क्षमतेवर आधारित असावी. भविष्यातील रोजगाराच्या दृष्टीने हे अधिक उपयुक्त ठरेल, असे त्यांचे मत आहे.

राम गोपाल वर्मा यांनी शिक्षण धोरणात सुचवले महत्त्वाचे बदल 

राम गोपाल वर्मा यांनी शिक्षण धोरणात काही महत्त्वाचे बदल सुचवले. त्यांच्या मते, विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीनुसार परीक्षा देण्याची मुभा असावी. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांचा कालावधीही विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गतीनुसार ठरवला जावा. काही विद्यार्थी सहा महिन्यांत एखादे कौशल्य आत्मसात करतात, तर काहींना त्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे सर्वांसाठी समान कालावधीचे शिक्षण योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.

NEET Re-Exam Paper Leak: नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला; रोहित पवारांचा ‘गुजरात कनेक्शन’चा दावा

AI टूल्स वापरण्याचे राम गोपाल वर्मांनी सांगितलेले पाच फायदे

  • शिक्षणाचा कालावधी आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.
  • प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक AI शिक्षक उपलब्ध होईल, त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावेल.
  • विषय, शिक्षक, शिकण्याची पद्धत आणि गती यामध्ये विद्यार्थ्यांना अधिक पर्याय मिळतील.
  • विद्यार्थी व्यवस्थेला जुळवून घेण्याऐवजी शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदलेल.
  • छोट्या शहरांतील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनाही महागड्या संस्थांतील विद्यार्थ्यांइतक्याच संधी मिळू शकतील.
Harsh Dubey NEET Controversy: कोण आहे हर्ष दुबे? ज्याच्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पेटले ‘Reservation Hatao Andolan’!

पोस्टच्या शेवटी राम गोपाल वर्मा यांनी केवळ सुधारणा नव्हे, तर शिक्षण क्षेत्रात AI आधारित क्रांतीची गरज असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, AI मुळे पारंपरिक शिक्षण व्यवस्थेतील अनेक मर्यादा दूर होऊ शकतात आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाचा नवा मार्ग खुला होऊ शकतो.

Web Title: Ram gopal varma on anti paper leak bill ai tools in exams marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • NEET Exam
  • PM Modi
  • Ram Gopal Varma

संबंधित बातम्या

India UAE Mega Deal : दुबईच्या शेखांनी खजिना खोलला! भारतात होणार तब्बल 1.10 लाख कोटींची गुंतवणूक
1

India UAE Mega Deal : दुबईच्या शेखांनी खजिना खोलला! भारतात होणार तब्बल 1.10 लाख कोटींची गुंतवणूक

Ethanol Blending : केंद्राचं पुढचं पाऊल… E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग; PM च्या सल्लागारांचा खुलासा
2

Ethanol Blending : केंद्राचं पुढचं पाऊल… E-20 नंतर आता डिझेलमध्येही इथेनॉल ब्लेंडिंग; PM च्या सल्लागारांचा खुलासा

Gati Shakti Vishwavidyalaya: देशातील एकमेव रेल्वे विद्यापीठाची जोरदार चर्चा; कुठले कोर्सेस शिकवले जातात? जाणून घ्या
3

Gati Shakti Vishwavidyalaya: देशातील एकमेव रेल्वे विद्यापीठाची जोरदार चर्चा; कुठले कोर्सेस शिकवले जातात? जाणून घ्या

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर
4

महत्त्वाची अपडेट! NEET PG 2026 परीक्षेची थेट फायनल आन्सर की येणार; निकालासाठी ‘या’ अधिकृत वेबसाइटवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.