
फोटो सौजन्य सोशल मीडिया
अशातच गाझा शहरात इस्रायली गोळीबारात शाहद अब्दुल रझाक अल नज्जार या आठ वर्षाच्या पॅलेस्टानी मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . १० ऑक्टोबर २०२६ रोजी पॅलेस्टानी वृत्तसंस्था वाफा ने वैद्यकीय सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे .
गाझा मधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे . हे आता कुठेतरी जाऊन थांबले पाहिजे .असे सामाजिक कार्यकर्त्यांच्या भावना निर्माण झालेल्या पाहायला मिळत आहेत .
वाफाच्या वृत्तानुसार गाझा शहरातील अल -जवाजात परिसरात इस्रायली क्वाडकोम्प्टर ड्रोनमधून करण्यात आलेल्या गोळीबारात शाहद या लहान मुलीला लक्ष करण्यात आले . या घटनेत तिचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली . या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
दरम्यान गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील खान युनिस येथेही गोळीबारात एक महिला जखमी झाल्याचे वृत्तात म्हंटले आहे . याशिवाय गाझा शहराच्या किनारपट्टीवर इस्रायली नौदलाच्या जहाजांतून गोळीबार करण्यात आला , तर शहराच्या पूर्वेकडील भागात लष्करी वाहनांतूनही गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे .
तसेच यासारख्या हल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची भीती सुद्धा आता निर्माण झाली आहे . कारण इस्रायल आता कोणीच विचारणारा राहिला नसल्यामुळे त्याला हवं तेव्हा हवं ते करण्यास तो मोकळा असल्याचे दिसून येत आहे .
गाझामध्ये सातत्याने सुरु असलेल्या हिंसक घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे . खासकरून लहान मुले आणि महिलांना आपला जीव गमवून या संघर्षाची मोठी किंम्मत चुकवावी लागत आहे . आठ वर्षाच्या शाहदचा मृत्यू ही या संघर्षातील मानवी हानीची आणखी एक दुर्दैवी घटना ठरली आहे . गाझातील परिस्थिती सामान्य होण्यासाठी हिंसाचार थांबणे आणि नागरिकांच्या संरक्षणाला प्राधान्य मिळणे महत्वाचे ठरणार आहे .