Salman Khan Gym Fire: सलमानच्या जिममध्ये आगीचा थरार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पोलिसांनी प्रथम जीममध्ये असलेल्या नागरिकांना बाहेर काढले. तो पर्यंत अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहचल्या. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळावलं. या दुर्घेटनेत सुदैवाने कोणतही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे.
आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध सध्या घेतला असताना विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असेल, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून या घटनेची सविस्तर चौकशी केली जात आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक आणि तांत्रिक पथकांनाही बोलावण्यात आलं आहे. ज्या भागात आग लागली होता तो परिसर सुरक्षिततेच्या कारणास्तव सील करण्यात आल्याची माहिती आहे. आग लागण्यापूर्वी जिममध्ये नेमकी काय परिस्थिती होती, विद्युत यंत्रणेत काही बिघाड झाला होता का आणि आग पसरण्यामागे इतर काही कारण होतं का, याचा तपास केला जात आहे.
ही जिम सलमान खानच्या फिटनेस ब्रँडशी जोडलेली असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या घटनेची बातमी समोर येताच सलमान खानच्या चाहत्यांचंही लक्ष या प्रकरणाकडे गेलं. सलमान स्वतः फिटनेससाठी ओळखला जातो आणि त्याची व्यायामाची आवड अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी जिमच्या आतील भागाचं किती नुकसान झालं आहे, याबाबत सध्या स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीमागचं खरं कारण आणि नुकसानीचं चित्र स्पष्ट होणार आहे.
सध्या तरी शॉर्ट सर्किटचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी तपास यंत्रणांचा अंतिम अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. पोलिसांसह फॉरेन्सिक टीमकडून मिळणाऱ्या निष्कर्षांनंतर या घटनेमागचं नेमकं कारण समोर येईल. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, हीच या घटनेतील दिलासादायक बाब आहे.






