(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Samay Raina: कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा त्याच्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोच्या अलीकडील एपिसोडमध्ये बिहार आणि काश्मीरमधील लोकांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या एपिसोडमधील काही संवादांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
‘इंडियाज गॉट लॅटेंट’च्या अलीकडील एपिसोडमध्ये पॅनेलिस्ट म्हणून शेरॉन शर्मा सहभागी झाल्या होत्या. शोदरम्यान समय रैना आणि शेरॉन शर्मा यांच्यात झालेल्या संवादात दोघांनीही एकमेकांच्या प्रादेशिक पार्श्वभूमीचा संदर्भ देत विनोद केला.
समय रैनाने शेरॉनच्या बिहारी पार्श्वभूमीवर टिप्पणी केली. त्यानंतर शेरॉननेही समयच्या काश्मिरी पार्श्वभूमीचा संदर्भ देत त्याला प्रत्युत्तर दिले.
शोदरम्यान समय रैना शेरॉनला उद्देशून म्हणतो की, “शेरॉन इतकी बिहारी आहे की तिला ‘इबोला’चा अर्थ कोणीतरी काही बोललं, म्हणजे ‘बोला’ असा वाटतो.”
समयच्या या विनोदावर शेरॉननेही त्याला प्रत्युत्तर दिले.
शेरॉनने समय रैनाच्या काश्मिरी पार्श्वभूमीचा संदर्भ देत म्हटले, “समय इतका कश्मीरी आहे की त्याला ‘स्टोन’ आवडतो.”
यानंतर दोघांमधील हा संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
‘बिहारी मुंबईत नोकरीसाठी येतात’ या वक्तव्यावरही वाद
यानंतर समय रैनाने शेरॉनच्या बिहारमधून मुंबईत नोकरीच्या शोधात येण्याचा उल्लेख करत पुन्हा विनोद केला. समयच्या या वक्तव्यावर शेरॉनने उत्तर देताना म्हटले, “कमीत कमी मी माझं राज्य माझ्या मर्जीने सोडलं आहे.”
या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
या वक्तव्यांनंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी समय रैना आणि ‘इंडियाज गॉट लॅटेंट’वर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
या वादात आता राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, शिवसेना नेते आनंद दुबे यांनी समय रैना आणि त्याच्या शोवर टीका केली. बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनीही नागरिक आणि समुदायांबाबत करण्यात आलेल्या अपमानजनक वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. समय रैना आणि शेरॉन शर्मा यांच्यातील संवाद आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी म्हटले असून, अशा प्रकारच्या टिप्पण्या सहन केल्या जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या वादात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, शिवसेना नेते आनंद दुबे यांनी समय रैना आणि त्याच्या शोवर टीका केली आहे.
बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनीही नागरिक आणि समुदायांबाबत करण्यात आलेल्या अपमानजनक वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. समय रैना आणि शेरॉन शर्मा यांच्यातील संवाद आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी म्हटले असून, अशा प्रकारच्या टिप्पण्या सहन केल्या जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
काँग्रेस नेते हरीश रावत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कॉमेडियन्सनी एखाद्या समुदायावर किंवा प्रदेशावर विनोद करताना अधिक संवेदनशीलता आणि सावधगिरी बाळगली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोभोवती वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शोमधील काही वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता बिहार आणि काश्मीरवरील वक्तव्यांमुळे समय रैना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
या प्रकरणावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात या वादाला आणखी कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






