Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा

Satara News : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित ‘नाट्य परिषद करंडक २०२६’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी साताऱ्यात होणार आहे. हौशी कलाकार, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नाट्य संस्थांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी असून, अंतिम विजेत्या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 09, 2026 | 06:35 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
  • अंतिम विजेत्या संघाला एक लाखांचे पारितोषिक
  • प्रवेशिकेसाठी १८ सप्टेंबर अंतिम मुदत
Satara News : सातारा जिल्ह्यातील हौशी नाट्य कलावंत आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रंगभूमीवर आपली कला सादर करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित ‘नाट्य परिषद करंडक २०२६’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी साताऱ्यात रंगणार आहे.

नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील नाट्य संस्था, महाविद्यालये आणि हौशी कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुख्य शाखा मुंबई यांच्या वतीने आयोजित ‘नाट्य परिषद करंडक २०२६’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे पडघम वाजले आहेत. साताऱ्यातही या स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगणार असून, जिल्ह्यातील हौशी नाट्य कलावंत, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नाट्य संस्थांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे.

शंभराव्या नाट्य संमेलनाचे औचित्य साधून उत्सव रंगभूमीचा, जागर हौशी नाट्य कलावंतांचा’ या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या या महोत्सवाचे यंदा सलग तिसरे वर्ष आहे. नवोदित आणि हौशी कलाकारांना रंगभूमीवर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

अंतिम विजेत्या संघाला एक लाखांचे पारितोषिक

महाविद्यालये तसेच विविध नाट्य संस्थांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेचे आयोजन प्राथमिक, विभागीय आणि अंतिम अशा तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. अंतिम फेरीतील विजेत्या संघाला तब्बल एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून, इतर विजेत्यांनाही भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील हौशी कलावंत आणि महाविद्यालयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे. स्पर्धेची अंतिम फेरी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथे होणार आहे.

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

प्रवेशिकेसाठी १८ सप्टेंबर अंतिम मुदत

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांसाठी प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर २०२६ आहे. इच्छुकांना नाट्य परिषदेच्या [www.natyaparishad.org] या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेशिका भरता येणार आहे.

सातारा केंद्रप्रमुख म्हणून राजेश कुंभारदरे, तर सातारा स्थानिक समन्वयक म्हणून बाळकृष्ण शिंदे आणि आनंद ऊर्फ बाळू कदम काम पाहत आहेत. जिल्ह्यातील नाट्यप्रेमी, हौशी कलाकार आणि महाविद्यालयांनी या संधीचा लाभ घेत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Satara news amateur artists to compete in satara for the natya parishad trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • Marathi Theatre
  • One Act Play
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
1

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
2

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
3

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
4

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.