Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shabana Azmi: CJP आंदोलनात शबाना आझमींची बिघडली तब्येत; अश्रुधुरामुळे अस्थमाचा अटॅक आल्याचा आरोप

Shabana Azmi Health:  दिल्लीतील NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या शबाना आझमी यांना अश्रुधुरामुळे अस्थमाचा झटका आला. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी पुन्हा आंदोलनात सहभाग घेत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 22, 2026 | 12:30 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Shabana Azmi Health:   दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपरफुटी आणि परीक्षेतील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांची प्रकृती बिघडली. आंदोलनावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर त्यांना अस्थमाचा झटका आल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.

२० जुलै रोजी झालेल्या ‘चलो संसद’ मोर्चात शबाना आझमी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सहभागी झाल्या होत्या. या मोर्चादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आणि अश्रुधुराचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. याचवेळी अश्रुधुराच्या संपर्कात आल्याने शबाना आझमी यांची प्रकृती अचानक बिघडली.

‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत शबाना आझमी म्हणाल्या, “मला अस्थमा आहे. अश्रुधुरामुळे मला त्याचा झटका आला. मात्र माझ्याकडे इन्हेलर (पंप) असल्यामुळे मला लवकर आराम मिळाला आणि आता मी पूर्णपणे ठीक आहे.”

प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जवळील एका इमारतीत नेण्यात आले. उपचारानंतर प्रकृती सुधारताच त्या पुन्हा आंदोलनस्थळी परतल्या आणि जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला.

‘अहंकारी सरकारचा अंत जवळ आलाय…’, राहुल गांधींना ताब्यात घेताच मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; सरकारवर साधला निशाणा

विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, “त्यांचे धाडस वाखाणण्याजोगे आहे. मी त्यांच्या संघर्षाला सलाम करते.”

शबाना आझमी यांनी यावेळी सांगितले की, त्यांनी आणि त्यांचे पती, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, यांनी यापूर्वी पंतप्रधानांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची विनंती केली होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात अभिनेते प्रकाश राज यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शबाना आझमी यांनी प्रकाश राज आणि इतर आंदोलकांसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा कायम असल्याचे सांगितले.

Saurabh Gokhale : अभिनेत्याने केली सरकारची पाठराखण? “मी हिंदुविरोधी गोष्टींना…” सौरभ गोखलेचे ‘ते’ विधान आले चर्चेत

राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं होते ताब्यात

नीट पेपरफुटी व गैरव्यवहाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टी मागील अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. 20 जुलैला सुरू असलेल्या या मोर्चात तरूण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरूण आंदोलकांना व विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर कॉंग्रेसने आक्रमक होत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आंदोलन केलं. विशेष म्हणजे या आंदोलनाबद्दल पोलिसांना कळू नये, ही काळजी कॉंग्रेसने घेतली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जात असल्याचे सांगून सर्वांना तेथे बोलावण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना आंदोलनाची माहिती देण्यात आली आणि जवळपास दोन तास आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर पोलिसांनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर सर्वांची सुटका करण्यात आली.

Web Title: Shabana azmi suffers asthma attack during neet protest actress says tear gas triggered her health scare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • delhi

संबंधित बातम्या

‘अहंकारी सरकारचा अंत जवळ आलाय…’, राहुल गांधींना ताब्यात घेताच मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; सरकारवर साधला निशाणा
1

‘अहंकारी सरकारचा अंत जवळ आलाय…’, राहुल गांधींना ताब्यात घेताच मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; सरकारवर साधला निशाणा

Abhijeet Dipke Update:  ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना
2

Abhijeet Dipke Update: ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना

Maharashtra Breaking News Updates Today: जंतर-मंतरवर आंदोलन सुरू, देशभरातून पाठिंबा
3

Maharashtra Breaking News Updates Today: जंतर-मंतरवर आंदोलन सुरू, देशभरातून पाठिंबा

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक
4

Raj Thackeray: ‘हे सरकार मानसिक रुग्ण, त्यांनाच हॉस्पिटलात भरती करा’; जंतर-मंतरवरील लाठीमारावर राज ठाकरे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.