Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishali Kadam Reveals: मुलीला घेऊन घर सोडण्याची वेळ आली, मुलगा मात्र शांतपणे पाहत राहिला; अरुण कदम यांच्या पत्नीचा खुलासा

Vaishali Kadam Reveals: मराठी अभिनेते अरुण कदम यांच्या पत्नी वैशाली कदम यांनी एका मुलाखतीत नवीन घर खरेदी करण्याचा रंजक किस्सा सांगितला. वैशाली यांनी शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून मिळालेल्या पैशांतून खार येथील घर खरेदीसाठी आर्थिक योगदान दिले होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 30, 2026 | 05:24 PM
Vaishali Kadam Reveals: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))

Vaishali Kadam Reveals: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))

Follow Us
Follow Us:
  • वैशाली कदम यांनी स्वतः घेतला घर बदलण्याचा निर्णय
  • शेअर मार्केटमधील पैशांतून खरेदी केले घर
  • शेवटी अरुण कदमही कुटुंबासोबत आले

Arun Kadam Wife On House Left : मराठी इंडस्ट्रीत अरुण कदम हे नाव सगळ्यांनाच माहित आहे. कॉमेडी असो किंवा सीरिअस भूमिका, त्यांनी नेहमीच लोकांना हसवलंय. पण कामापेक्षा जास्त ते त्यांच्या खऱ्या आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांची पत्नी वैशाली कदम या सिनेमात काम करत नाहीत, पण सोशल मीडियावर त्या चांगल्याच फेमस आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या नवीन घराचा एक भारी किस्सा सांगितला आहे. Vaishali Kadam Reveals:

शेअर मार्केटमधून जमवले पैसे आणि घेतलं घर

वैशाली यांनी सांगितलं की मी आधी पूर्णवेळ हाऊस वाईफ होते. पण घरी बसून पण मी शेअर मार्केट बघायचे. थोडे थोडे पैसे गुंतवत गेले आणि त्यातून मला चांगला नफा मिळाला. हळूहळू अजून पैसे गुंतवावेसे वाटले. आम्ही खारमध्ये जे घर घेतलं, ते याच पैशातून घेतलं आहे. त्यात अरुणचे अर्धे पैसे आणि माझे अर्धे पैसे आम्ही लावले होते.आम्ही आधी खारच्या पूर्वेला राहत होतो. पण तिथे माझं मन लागत नव्हतं. मला नेहमी वाटायचं की आपण अजून पुढे गेलं पाहिजे, मोठं घर घेतलं पाहिजे. पण अरुणचा प्रॉब्लेम वेगळा होता. त्याची आई शेजारीच राहायची, त्यामुळे तो म्हणायचा मी आईला सोडून कुठेही जाणार नाही.

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!

बायकोने एकटीने घेतला निर्णय

त्यावेळी मी अरुणला खूप समजावलं. म्हटलं, घराचे भाव रोज वाढतायत, आता नाही घेतलं तर नंतर घेणं अवघड होईल. आता इन्व्हेस्ट करायची हीच वेळ आहे. माझी एक मैत्रीण होती, ती मला सारखी म्हणायची की तू तिथून बाहेर पड, जर आताच पाऊल उचललं नाहीस तर आयुष्यात काहीच होणार नाही.

पण अरुण काही केल्या ऐकायला तयार नव्हता. तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. मग मी विचार केला, हा येत नसेल तर मी एकटी जाते. मी स्वतः जाऊन भाड्याने घर शोधलं आणि तिथे राहायला गेले. सगळं घर मी एकटीने बघून आले होते. माझी मुलगी सुकन्या त्यावेळी मोठी झाली होती. ती नेहमी माझ्या सोबत असायची. मी तिला सांगितलं की मी असा निर्णय घेते आहे. ती पण म्हणाली, आई तू म्हणतेस ते बरोबर असेल तर कर. पण पप्पाचं काय? मी म्हटलं बघूया काय होतंय ते. मी तिला पण ते नवीन घर दाखवून आणलं. सगळे कागदपत्रे, व्यवहार सगळं मी एकटीने केलं.

Eetha Trailer Out: ‘नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी’, श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

शेवटी रुसलेले अरुण कदम कसे आले?

माझ्या मैत्रिणीने मला आयडिया दिली होती की आधी तू भाड्याने तिकडे राहायला जा, म्हणजे तुला आजूबाजूला चांगलं घर मिळेल. तिथे राहिल्यावरच आजूबाजूच्या घरांची माहिती कळते. म्हणून मी घरातून बाहेर पडले.

त्यावेळी माझ्याकडे थोडे जास्त पैसे होते, त्यामुळे मी पण अरुणला जास्त विचारलं नाही. त्या हसत हसत म्हणाल्या की मी तेव्हा सक्षम होते, पण हा पण त्याच्या मतावर ठाम होता की मी आईला सोडणार नाही.

मग मी आणि माझी मुलगी सुकन्याने मिळून ट्रक बोलावला. सामान भरायला सुरुवात केली. तेव्हा अरुण एका कोपऱ्यात रुसून बसला होता. त्याने ठरवलं होतं की काही झालं तरी मी या घरातून जाणार नाही.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत वैशाली पुढे म्हणाल्या, मग मी त्याला सरळ सांगितलं, ठीक आहे तू इथेच राहा. मी माझा सगळा संसार, मला लागणाऱ्या गोष्टी सगळं पॅक केलं. पण मुद्दाम त्याच्या कपड्यांना हात पण लावला नाही.

सगळं सामान बाहेर काढल्यावर शेवटची बॅग घेताना मी त्याला विचारलं, आता तू काय करणार आहेस? तेव्हा तो लहान मुलासारखा रुसून म्हणाला, भर माझी पण बॅग! आता बायको आणि मुलीशिवाय तो एकटा कसा राहणार? शेवटी तो यायला तयार झाला. अगदी शेवटच्या क्षणाला मी त्याचे कपडे भरले. त्याने मला अजिबात मदत केली नाही. त्याला कार्यक्रमात मिळालेल्या शालींमध्ये मी त्याचे सगळे कपडे भरले आणि आम्ही नवीन घरात निघालो.

Web Title: Vaishali kadam arun kadam new house stock market investment story rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त
1

Nagpur News : एस्कॉर्ट पथकाची यशोधरानगरात कारवाई ;९ लाखांचा गुटखा, पानमसाला जप्त

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स
2

Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास
3

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास

Raigad News: सह्याद्रीच्या जंगलतोडीविरोधात शेकाप आक्रमक; चित्रलेखा पाटील यांचा टोरंट प्रकल्पाला विरोध
4

Raigad News: सह्याद्रीच्या जंगलतोडीविरोधात शेकाप आक्रमक; चित्रलेखा पाटील यांचा टोरंट प्रकल्पाला विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.