Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पेड्डी’साठी राम चरणच्या मेहनतीचे श्याम कौशल यांनी केले कौतुक; आमिर खानशी तुलना करत काय म्हणाले?

‘पेड्डी’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्यानंतरही राम चरणने पापणीवर टाके असतानाच क्लायमॅक्स फाईटचे शूटिंग पूर्ण केले. ॲक्शन दिग्दर्शक श्याम कौशल यांनी सांगितलेला हा किस्सा सध्या चर्चेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 12, 2026 | 02:54 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

भारतीय सिनेमातील बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पेड्डी’ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. राम चरण, जान्हवी कपूर आणि दमदार कलाकारांच्या फौजेने सजलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तोंडी प्रसिद्धीचाही मोठा फायदा होताना दिसत आहे. अवघ्या सात दिवसांत चित्रपटाने जगभरात ₹345 कोटींहून अधिक कमाई केल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपटाच्या या यशानंतर ॲक्शन दिग्दर्शक श्याम कौशल यांनी राम चरणच्या मेहनतीबद्दल आणि कामाप्रती असलेल्या समर्पणाबद्दल भरभरून कौतुक केले आहे. बॉलिवूडमधील मोठ्या शारीरिक परिवर्तनांचा उल्लेख करताना त्यांनी राम चरणची तुलना थेट आमिर खान यांच्याशी केली.

एका मुलाखतीदरम्यान श्याम कौशल म्हणाले, “माझ्या मते अभिनेता राम चरण आणि आमिर खान यांची कामाप्रती असलेली बांधिलकी खरोखरच विलक्षण आहे. ‘दंगल’ चित्रपटासाठी आम्ही आधी वडिलांच्या भूमिकेचे शूटिंग केले होते आणि केवळ पाच महिन्यांत आमिर खान यांनी स्वतःमध्ये संपूर्ण शारीरिक बदल घडवून आणला होता. राम चरणचे समर्पणही अगदी तसेच आहे.”

श्याम कौशल यांनी चित्रपटातील सर्वात आव्हानात्मक दृश्यांपैकी एका क्लायमॅक्स फाईट सिक्वेन्सचा उल्लेख केला. ते म्हणाले, “अखाड्यातील क्लायमॅक्स फाईटच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवाने राम चरण जखमी झाले होते. त्यांच्या पापणीवर टाके घालावे लागले. मात्र, त्या टाक्यांसह त्यांनी संपूर्ण फाईट सिक्वेन्सचे शूटिंग पूर्ण केले, कारण आम्हाला शूट पुढे ढकलणे शक्य नव्हते. तो स्टेडियम पुन्हा उपलब्ध होणार नव्हता.”

Welcome To The Jungle: स्टार्सची फौज, पण जुनेच विनोद! ‘वेलकम टू द जंगल’ प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी ठरणार का?

राम चरणच्या व्यावसायिकतेचे कौतुक करत श्याम कौशल पुढे म्हणाले, “ते जखमी होते, पण त्यांना पाहून कधीच वाटले नाही की त्यांना दुखापत झाली आहे. त्यांनी कुणालाही हे जाणवू दिले नाही की ते वेदनेत आहेत किंवा शूटिंग कसे पूर्ण करणार आहेत. यालाच खरे समर्पण आणि खेळाडूपणा म्हणतात.”

राम चरणसोबतच्या वैयक्तिक नात्याबद्दल बोलताना श्याम कौशल म्हणाले, “तो खूप गोड आणि नम्र माणूस आहे. तो मला नेहमी माझ्या मुलांप्रमाणे मिठी मारायचा. आमचे नाते खूपच छान होते. या चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.”

Zee Marathi New Serial: संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा भव्य शुभारंभ; कलाकारांनी साधला प्रेक्षकांशी संवाद

बुच्ची बाबू सना लिखित आणि दिग्दर्शित ‘पेड्डी’मध्ये राम चरण मुख्य भूमिकेत असून त्यांच्यासोबत शिव राजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा आणि जगपती बाबू महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकत आहेत. वेंकट सतीश किलारू यांनी वृद्धी सिनेमाज बॅनरअंतर्गत, मायथ्री मूव्ही मेकर्स आणि IVY Entertainment यांच्या सहकार्याने चित्रपटाची निर्मिती केली आहे.3 जून 2026 रोजी जागतिक प्रीमियर झालेल्या ‘पेड्डी’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

Web Title: Shyam kaushal praises ram charans dedication for peddi what did he say while comparing him to aamir khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • Ram Charan

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.