Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Siddharth Jadhav Death Rumour: स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहून सिद्धार्थ जाधवचा चढला पारा; व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर, म्हणाला..

Siddharth Jadhav Death Rumour: सिद्धार्थ जाधवच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आणि खोटी बातमी पसरवणाऱ्यांना सुनावलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 25, 2026 | 09:57 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Siddharth Jadhav Death Rumour: लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सिद्धार्थच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, ही बातमी पाहून अभिनेत्याचा चांगलाच पारा चढला आहे. सिद्धार्थने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत या खोट्या बातमीचा समाचार घेतला आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल

सोशल मीडियावर एका युट्यूब चॅनेलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ‘अभिनेते सिद्धार्थ जाधव यांची मृत्यूशी झुंज, गंभीर आजार’ अशा आशयाची बातमी दाखवण्यात आली आहे. स्वतःच्याच मृत्यूची बातमी पाहिल्यानंतर सिद्धार्थला हसू अनावर झालं.

अभिनेत्याने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत संबंधितांना चांगलंच सुनावलं आहे. तसेच आपली प्रकृती ठणठणीत असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.

“मी ठणठणीत बरा आहे…”

सिद्धार्थने पोस्टमध्ये लिहिलं, “नमस्कार, मी ठणठणीत बरा आहे… व्यवस्थित ‘अॅनिमल’चे प्रयोग, ‘धिंगाणा’चं शूट सुरू आहे. ज्या ज्या लोकांनी काळजीने मेसेज/कॉल केलेत, त्यांना मनापासून धन्यवाद.”

पुढे त्याने बातमीदारांना थेट सवाल करत म्हटलं, “बातमीदार जरा मलातरी विचारा… एवढी कसली घाई आहे तुम्हाला?”

“ज्याने हेडलाइन बनवली त्याला नोबेल द्याच!”

सिद्धार्थने उपरोधिक शैलीत खोटी बातमी तयार करणाऱ्याची खिल्लीही उडवली. त्याने लिहिलं, “ज्याने Headline/Coverage बनवलाय, त्याला तर Nobel द्याच.”

तसंच, “Man is a more dangerous Animal than an ‘ANIMAL’” असं म्हणत त्याने या प्रकारावर भाष्य केलं.

विशेष म्हणजे, या खोट्या बातमीमुळे झालेल्या चर्चेचा आपल्या नाटकाच्या प्रमोशनसाठी उपयोग करून घेत सिद्धार्थने पुढे लिहिलं, “त्यांचं जाऊदे… निदान माझ्या नाटकाचं तरी promotion करतो.” त्याने आपल्या नाटकाचा प्रयोग २६ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता छत्रपती शिवाजी मंदिर, दादर येथे असल्याचं सांगितलं

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “भावाला बिकिनी घालून राखी का बांधाल?”, कंगना रनौतने कृती सेननला सुनावलं; जाहिरातीवरून वाद पेटला

चाहत्यांसह कलाकारांनीही व्यक्त केला संताप

सिद्धार्थच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने “लोक वेडे आहेत” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या युजरने, “वायरल होण्यासाठी लोकं एवढ्या खालच्या पातळीवर जातील, सांगता येत नाही,” असं म्हटलं.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेही सिद्धार्थच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत “लोक वेडे झाले आहेत” असं म्हटलं आहे. तिने हसण्यासोबतच रागाचे इमोजीही शेअर केले.

दरम्यान, सिद्धार्थ जाधवच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, खोटी बातमी पसरवणाऱ्यांवरही नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Sriya Reddy Mahakali: कोण आहे श्रिया रेड्डी? ‘महाकाली’ बनून अक्षय खन्नावर पडली भारी; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची आहे लेक!

Web Title: Siddharth jadhav death rumour fake news actor reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • siddharth Jadhav

संबंधित बातम्या

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
1

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख
2

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.