Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Soundous Moufakir : धर्माने मुस्लिम असून हिंदू पद्धतीने केली पूजा! सुरु केला व्यवसाय, कोण आहे ही अभिनेत्री?

मोरोक्कोची मॉडेल आणि अभिनेत्री साउंडूस मौफाकीर हिने नव्या स्किनकेअर व्यवसायाची सुरुवात घरातील पूजेने केल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मुस्लिम असूनही हिंदू सहकाऱ्यांच्या श्रद्धेचा आदर म्हणून पूजा केल्याचे तिने स्पष्ट केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 03, 2026 | 03:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • नव्या व्यवसायानिमित्त घरी आयोजित केलेल्या पूजेमुळे या चर्चेला मोठा वेग मिळाला आहे.
  • खरी टीम म्हणजे एकमेकांच्या श्रद्धेचा सन्मान करत कायम एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं.”
  • प्रवास आता फक्त सुरू झाला आहे… पुढचा प्रवास आणखी सुंदर असेल.”
परदेशात शिक्षण घेणाऱ्या पाहुण्यांना भारतीय मनोरंजनसृष्टीसाठी विशेष आकर्षण आहे, याची ग्वाही नेहमीच मिळत असते. अनेक परदेशी पाहुण्यांनी भारतीय सिनेमात स्वतःची ओळख तयार केली आहे. त्यातील एक नाव म्हणजे Soundous Moufakir! या फॅशन-मॉडेल आयकॉनने नुकताच एक नवा व्यवसाय सुरु केला आहे. मूळची Morocco या देशाची असलेली सुंदुस, धर्माने इस्लाम आहे. दरम्यान, तिने नवा स्किन केअर प्रोडक्टसचा व्यवसाय सुरु केल्यामुळे तिची चर्चा तर होतीच. पण तिने या नव्या व्यवसायानिमित्त घरी आयोजित केलेल्या पूजेमुळे या चर्चेला मोठा वेग मिळाला आहे.

Dipika Kakar : कॅन्सर, वडिलांचं आजारपण अन् घरातील संकटं; दीपिका-शोएबचा 2 वर्षांचा मुलगा एकटेपणाशी झुंजतोय

एखादा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी शांती आणि भरभराटीसाठी पूजा करणे हा अनेक भारतीयांचा विश्वास आहे. हाच विश्वास मनात कायम ठेवून Soundous Moufakir ने तिच्या नव्या व्यवसायाची सुरुवात केली. आयोजित केलेल्या या पूजेची पोस्ट पाहता तिच्या काही चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर अनेकांनी तिला ट्रॉलही केले आहे. पण तिने या ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर देत कमेंट केली आहे की, “मला माझ्या मुस्लिम धर्माचा अभिमान आहे आणि माझा धर्म नेहमीच माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहील. पण माझ्यासोबत काम करणारे हिंदू सहकारीही माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. हा नवा प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांनाही त्यांच्या श्रद्धेनुसार समाधान मिळावे, अशी माझी इच्छा होती. जसं त्यांनी माझ्या नमाज आणि प्रार्थनेच्या वेळी माझी साथ दिली, तसंच मीही त्यांच्या श्रद्धेचा आदर केला. खरी टीम म्हणजे एकमेकांच्या श्रद्धेचा सन्मान करत कायम एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं.”

Bharti Sigh Birthday: संघर्षातून ‘कॉमेडी क्वीन’पर्यंतचा भारतीचा प्रवास; आज 80 कोट्यवधींची मालकीण, पाहा तिचं आलिशान कार कलेक्शन


सुंदुसने शेअर केलेल्या या पोस्टखाली सुंदर असे कॅप्शन देत तिच्या नव्या व्यवसायाविषयी माहिती दिली आहे. तिने नमूद केले आहे की, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरला. आज @moromaaofficial च्या नव्या प्रवासाची सुरुवात आम्ही पहिल्या पूजेने केली. कोणत्याही यशापूर्वी देवाचे आशीर्वाद घेणं, कृतज्ञता व्यक्त करणं आणि हा प्रवास योग्य दिशेने व्हावा, हीच आमची भावना होती. आमच्या कामाला यश मिळावं, संपूर्ण टीमवर देवाची कृपा राहावी आणि प्रत्येक पाऊल सकारात्मकतेने पुढे पडावं, अशी मनापासून प्रार्थना केली. आज टीमसोबत उभं असताना पुन्हा एकदा जाणवलं की, कोणताही ब्रँड एका व्यक्तीच्या बळावर उभा राहत नाही. तो विश्वास, मेहनत, समर्पण आणि एकत्र काम करणाऱ्या माणसांमुळे घडतो. अशा टीमसोबत हा प्रवास सुरू करण्याची संधी मिळणं, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मोरोमावर पहिल्या दिवसापासून प्रेम, विश्वास आणि पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार. तुमच्या विश्वासामुळेच हा प्रवास अधिक अर्थपूर्ण झाला आहे. देवाने आपल्या सर्वांवर सदैव कृपा ठेवावी, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. हा प्रवास आता फक्त सुरू झाला आहे… पुढचा प्रवास आणखी सुंदर असेल.”

Web Title: Soundous mufakir started a new business and performed a puja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Celebrity
  • entertainment

संबंधित बातम्या

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
1

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
2

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
3

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
4

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.