Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

South Theatre Release: एक-दोन नाही… तब्बल 11 दाक्षिणात्य चित्रपट एकाच आठवड्यात! बॉक्स ऑफिसवर कोण मारणार बाजी?

South Theatre Release: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे चाहते या आठवड्यात मनोरंजनाची मोठी मेजवानी अनुभवणार आहेत. ७ ऑगस्टपासून तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांतील तब्बल १४ नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 04, 2026 | 06:42 PM
South Theatre Release: एक-दोन नाही... (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

South Theatre Release: एक-दोन नाही... (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ७ ऑगस्टपासून १४ नवीन दाक्षिणात्य चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार.
  • तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांतील विविध शैलींचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार.
  • ॲक्शन, हॉरर, कॉमेडी, थ्रिलर आणि रोमँटिक ड्रामामुळे मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. दमदार कथा, भन्नाट ॲक्शन, वेगळे विषय आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे साऊथचे चित्रपट आता देशभरात लोकप्रिय झाले आहेत. याच चाहत्यांसाठी हा आठवडा खास ठरणार आहे. कारण ७ ऑगस्टपासून विविध भाषांतील तब्बल 14 नवीन दक्षिण भारतीय चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होत आहेत. तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतील वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट एकाच आठवड्यात प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षकांसमोर भरपूर पर्याय असणार आहेत.

यावेळी केवळ ॲक्शनच नाही, तर हॉरर, कॉमेडी, कौटुंबिक कथा, रहस्य, रोमँटिक ड्रामा आणि थ्रिलर अशा विविध प्रकारचे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

हॉरर आणि कॉमेडीचा तडका

या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘कोरियन कनकराजू’ विशेष चर्चेत आहे. विनोदी आणि भयपटाचा संगम असलेल्या या तेलुगू चित्रपटात वरुण तेज प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरनंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. (South Theatre Release:)

कौटुंबिक नात्यांची भावनिक गोष्ट

मल्याळम चित्रपट ‘विवाह’ चार महिलांच्या आयुष्याभोवती फिरणारी कथा मांडतो. प्रेम, संसार आणि नातेसंबंधांमधील भावनिक चढ-उतार या चित्रपटातून दाखवण्यात आले आहेत. कौटुंबिक कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट चांगला पर्याय ठरू शकतो.

ॲक्शनप्रेमींसाठी खास मेजवानी

कन्नड चित्रपट ‘आयोग्य २’ आणि ‘KJQ’ हे दोन्ही चित्रपट दमदार ॲक्शनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रोमँटिक आणि ॲक्शनचा मिलाफ असलेल्या या चित्रपटांकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. तर तमिळमधील आणखी एक ॲक्शन थ्रिलर एका अशा तरुणाची कथा सांगतो, जो नकळत एका गंभीर गुन्ह्यात अडकतो आणि त्यानंतर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. रहस्य आणि थराराने भरलेली ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

रोमँटिक आणि ड्रामा चित्रपटही रांगेत

‘अम्मा नाकू आ अब्बाय कावली’ हा तेलुगू रोमँटिक ड्रामा देखील याच आठवड्यात प्रदर्शित होत आहे. प्रेम, भावना आणि कौटुंबिक नात्यांवर आधारित ही कथा तरुण प्रेक्षकांना आकर्षित करू शकते.

Gullak x CEEW: ‘गुल्लक’ आणि CEEW ची भागीदारी; छतावरील सौरऊर्जेबाबत जनजागृतीसाठी नवा उपक्रम

रहस्य आणि सस्पेन्सची चाहत्यांसाठी पर्वणी

मल्याळम चित्रपट ‘थुडक्कम’ एका तरुणीच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. एका संकटानंतर तिच्या आयुष्याला वेगळे वळण मिळते आणि त्यानंतर उलगडत जाणारी कथा हा चित्रपट दाखवतो.

कन्नडमधील ‘डिटेक्टिव्ह तीक्ष्णा’ हा गुन्हेगारी तपासावर आधारित ॲक्शन थ्रिलर आहे. प्रियंका उपेंद्र प्रमुख भूमिकेत असल्याने या चित्रपटाकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

जंगल, रहस्य आणि थरार

तमिळ चित्रपट ‘फोटोग्राफर’ एका वन्यजीव छायाचित्रकाराची कथा सांगतो. दुर्मिळ प्राण्यांच्या शोधात जंगलात गेलेला हा छायाचित्रकार काही विचित्र घटनांचा साक्षीदार ठरतो आणि त्यानंतर घडणाऱ्या रहस्यमय प्रसंगांमुळे कथा अधिक रंजक बनते.

मोठ्या कलाकारांचे चित्रपटही सज्ज

या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये आर. माधवन, प्रियामणी आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘GDN’ विशेष चर्चेत आहे. चरित्रपटाच्या धाटणीतील हा चित्रपट मोठ्या कलाकारांमुळे आधीपासूनच चर्चेत आहे.

याशिवाय ‘अक्षरा’ हा कन्नड हॉरर थ्रिलरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका डॉक्टरला एका प्रसिद्ध लेखकाशी संबंधित गूढ रहस्य समजते आणि त्यानंतर कथेला अनपेक्षित वळण मिळते.

Mazi Mhanu ka Song : ‘फियाट गाडी माझी म्हणू का?’ गाण्याने सोशल मीडियावर लावली धूम; पण ‘या’ गाण्यामागची कथा आणि फियाट कारचा इतिहास

प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी

एकाच आठवड्यात इतक्या विविध विषयांवरील दक्षिण भारतीय चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चित्रपटप्रेमींसाठी हा आठवडा खास ठरणार आहे. हलकाफुलका विनोद, जबरदस्त ॲक्शन, कौटुंबिक कथा, सस्पेन्स किंवा हॉरर अशा कोणत्याही प्रकारचे चित्रपट पाहायचे असतील, तरी यावेळी प्रत्येक प्रेक्षकासाठी काही ना काही नक्कीच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे या आठवड्यात थिएटरमध्ये मनोरंजनाची रंगत चांगलीच वाढणार, यात शंका नाही.

Web Title: South theatre release 7th august korean kanakaraju gdn dc ayogya 2 kjq thudakkam detective teekshana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • entertainment news update
  • Marathi News

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.