(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Sukriti kakar Engagement : ‘कर गई चुल्ल’ फेम लोकप्रिय गायिका सुकृती कक्कर हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सुकृतीने तिचा प्रियकर आणि व्यावसायिक शौमिक शेट्टी याच्यासोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर सुकृतीने तिच्या स्वप्नवत प्रपोजलचे काही सुंदर फोटो शेअर करत या खास क्षणाची झलक चाहत्यांना दिली.
सुकृतीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शौमिक तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे. हिरव्यागार शेतांच्या सुंदर पार्श्वभूमीवर हा खास प्रपोजलचा क्षण पार पडला.
इतर फोटोंमध्ये सुकृती आणि शौमिक एकत्र रोमँटिक क्षणांचा आनंद घेताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये दोघेही निसर्गरम्य ठिकाणी डिनर डेट एन्जॉय करताना दिसतात.
या फोटोंमध्ये सुकृतीने तिची सुंदर हिऱ्याची साखरपुड्याची अंगठीही फ्लाँट केली आहे. फोटो शेअर करताना तिने “आज, उद्या आणि कायम” असं गोड कॅप्शन लिहिलं आहे. यासोबत तिने हार्ट आणि रिंग इमोजीही वापरले आहेत.
सुकृतीच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
सुकृती कक्कर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. ‘कपूर अँड सन्स’ चित्रपटातील ‘कर गई चुल्ल’ या गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
याशिवाय ‘पठाण’मधील ‘झूमे जो पठाण’, ‘मैने तुझको देखा’ आणि ‘हमराह’ यांसारख्या गाण्यांसाठीही ती ओळखली जाते. सुकृतीने तिची जुळी बहीण प्रकृती कक्कर हिच्यासोबतही अनेक संगीत प्रकल्पांवर काम केलं आहे.
सुकृतीचा होणारा पती शौमिक शेट्टी हा मुंबईस्थित व्यावसायिक आहे. तो वेलनेस, हॉस्पिटॅलिटी आणि लक्झरी अनुभवांशी संबंधित व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.
त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, शौमिक हा मुंबईतील ‘Courtside’ या लक्झरी पॅडल क्लबचा सह-संस्थापक आहे. सुकृती आणि शौमिक यांनी त्यांच्या नात्याचा नवा टप्पा सुरू केला असून, त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.






