(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
सध्या सोशल मीडियावर ‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ हे गाणं चांगलंच ट्रेंडिंग आहे. याच गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी जबरदस्त डान्स केला आहे. दोघांनीही गाण्याच्या तालावर उत्साहात डान्स करताना आपली खास एनर्जी दाखवली आहे.यांचा हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांच्या या डान्स व्हिडिओला एक तासात १ लाखांहून अधिक व्हयूज मिळाले आहेत. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि अविनाश यांचा भन्नाट अंदाज पाहायला मिळत आहे. दोघांची डान्समधील केमिस्ट्री आणि उत्साह चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram
स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू हे गाणं निशा गायकवाडने गायलं असून आशिष शिंदेने याला संगीत दिले आहे. या व्हिडिओला ” जानूची स्प्लेंडर” असं कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. विशेषतः अविनाश नारकर यांच्या एनर्जीचं नेटकरी कौतुक करत आहेत. ऐकाने लिहिले, ”अविनाश सरांची एनर्जी नेहमीच तुफान असते… ते खूप भारी आहेत”, दुसऱ्याने लिहिले, ” लय भारी ताईसाहेब”, ”अप्रतिम डान्स कमाल”, या व्हिडिओवर तितीक्षाने ”कडक..” अशी कमेंट केली आहे.






