फोटो सौजन्य - Social Media
नुकताच झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा पार पडला आहे. सिने क्षेत्रातील तसेच लहान पडद्यावरील कलाकारांचे या सोहळ्यात सन्मान करण्यात आले. या सोहळ्यात अनेक दिग्गज तसेच इतर कलाकारमंडळी उपस्थित होती. अनेक कलाकारांनी त्यांची कला झी चित्र गौरव सोहळ्याच्या मंचावर सादर केली. या दरम्यान सगळ्यांच्या लक्षात आलेले पात्र म्हणजे ‘सुरज चव्हाण’! एका कलाकाराने त्या मंचावर सुरज चव्हाणची मिमिक्री केली होती, जी फार चर्चेत आली आणि प्रेक्षकांना आवडलीदेखील! पण अशातच ओरिजनल सुरज चव्हणच्या मनात एक खंत आली आहे.
सुरज चव्हाण झी टीमकडून सध्या नाराज असल्याचे दिसून येत आहे. “माझी मिमिक्री केली. प्रेक्षक हसले, मी खुश आहे पण मला त्या कार्यक्रमात बोलावलं असतं तर मला आणखीन बरं वाटलं असतं.” अशी काही खंत सुरज चव्हाणच्या मनामध्ये आहे. ती खंत त्याने त्याच्या चाहत्यांशी शेअर केली आहे. तसेच चाहत्यांना एक विचारणाही केली आहे. सुरज चव्हाणचे म्हणणे आहे की “चाहत्यांनो! आता तुम्हीच सांगा. मला त्या पुरस्कार सोहळ्यात बोलवले पाहिजे होते की नाही? त्यांनी मला न बोलावून योग्य केले आहे का?”
सुरज चव्हाणच्या मनात फार मोठी खंत तसेच तो खूप दुखावले असल्याचे ही दिसून आले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याच्या चाहत्यांनी त्याला धीर दिला आहे आणि आम्ही सगळे तुझ्या पाठीशी खंबीर आहोत, असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. अनेकांनी सांगितलं की “हो, सूरजला त्या पुरकर सोहळ्यात बोलवलं पाहिजे होतं.”
सुरज चव्हाण बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता आहे. दरम्यान, तो त्याच्या लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आला होता. तसेच त्याला महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हक्काचे आलिशान घर बांधून दिल्यामुळे तो खूप चर्चेतही होता.






