Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

The Exorcist Movie: रविवारी हॉरर सिनेमा पाहण्याचा मूड असेल तर ‘द एक्सॉर्सिस्ट: बिलीवर’ हा एक पर्याय ठरू शकतो. १९७३ मधील प्रसिद्ध ‘द एक्सॉर्सिस्ट’शी जोडलेली ही कथा दोन मुलींच्या अचानक बेपत्ता होण्याभोवती फिरते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 23, 2026 | 05:30 PM
The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दोन मुली जंगलात गेल्यानंतर अचानक बेपत्ता होतात
  • तीन दिवसांनी परतल्यानंतर त्यांना काहीच आठवत नसतं
  • वागण्यात बदल झाल्यानंतर सुरू होतो भय आणि गूढतेचा खेळ
The Exorcist Believer Movie: या रविवारी काहीतरी हॉरर पाहायचं मन होतयं, तर मग आत्ताच हा चित्रपट पाहा. ‘द एक्सॉर्सिस्ट: बिलीवर’ हा त्याच प्रकारचा चित्रपट आहे. भय, गूढ घटना आणि भूतबाधेभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना सुरुवातीपासून अस्वस्थ वातावरणात घेऊन जाते. सिनेमा 1973 मध्ये आलेल्या प्रसिद्ध ‘द एक्सॉर्सिस्ट’शी जोडलेला आहे.

त्यामुळे जुन्या चित्रपटाची ओळख असलेल्या प्रेक्षकांसाठी यामध्ये आणखी एक कुतूहल आहे. मात्र, कथा समजून घेण्यासाठी केवळ जुन्या भागावर अवलंबून राहण्याची गरज नाही. नवीन पात्रं, वेगळ्या घटना आणि दोन मुलींच्या अचानक बदललेल्या वागण्यामुळे चित्रपटाची गोष्ट स्वतःची वेगळी दिशा घेते.

जंगलात गेल्या अन् अचानक गायब झाल्या

कथेच्या केंद्रस्थानी विक्टर फील्डिंग नावाचा एक वडील आहे. तो आपल्या मुलगी एंजेलाची एकट्याने काळजी घेत असतो. एंजेला आणि तिची मैत्रीण कॅथरीन एका दिवशी जंगलात जातात. दोघी काही वेळात परततील असं वाटत असतं. पण वेळ निघून जातो आणि त्या घरी येत नाहीत. टुंबीयांची चिंता वाढते. मुलींचा शोध सुरू होतो. तब्बल तीन दिवसांनंतर त्या दोघी परत सापडतात.

इथूनच खरी विचित्र गोष्ट सुरू होते. मुलींना या काळात त्यांच्यासोबत काय झालं होतं, याची काहीच आठवण नसते. सुरुवातीला हा प्रकार एखाद्या साध्या धक्क्याचा परिणाम वाटतो. पण पुढे त्यांच्या वागण्यात बदल होऊ लागतो. च्या बोलण्यात, हालचालींमध्ये आणि स्वभावात जाणवणारे फरक पाहून विक्टरच्या मनात शंका निर्माण होते. ही केवळ मानसिक समस्या नाही, काहीतरी वेगळंच घडलं आहे, अशी त्याला जाणीव होऊ लागते.

जुन्या घटनेशी जोडला जातो धागा

मुलींच्या मदतीसाठी विक्टर क्रिस मॅकनीलकडे जातो. क्रिसला अशा प्रकारच्या घटनेचा पूर्वीच अनुभव आलेला असतो. तब्बल पाच दशकांपूर्वी तिच्या स्वतःच्या मुलीसोबत एक भयानक प्रसंग घडला होता. मुळे विक्टरला मुलींच्या परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगण्यासाठी क्रिस महत्त्वाची ठरते. त्यानंतर कथा श्रद्धा, भीती आणि भूतबाधेच्या प्रश्नाभोवती फिरू लागते. मुलींना नेमकं काय झालं आहे, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव आहे आणि त्यांना या अवस्थेतून बाहेर कसं काढायचं, याची धडपड सुरू होते. The Exorcist Movie:

चित्रपटात कोण कलाकार आहेत?

‘द एक्सॉर्सिस्ट: बिलीवर’चं दिग्दर्शन डेव्हिड गॉर्डन ग्रीन यांनी केलं आहे. लेस्ली ओडम ज्युनियर, लिड्या ज्यूएट, ओलिविया ओ’नील, जेनिफर नेटल्स, नॉर्बर्ट लिओ बुट्झ आणि अॅन डॉव्ड यांसारखे कलाकार या चित्रपटात दिसतात. सिनेमा 6 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. त्याची लांबी जवळपास एक तास 51 मिनिटे आहे. म्हणजे कथा फार लांबवलेली नाही. मात्र, चित्रपटातील गूढ वातावरण आणि अचानक घडणारे प्रसंग शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवतात.

कमाई आणि रेटिंग किती?

चित्रपट बनवण्यासाठी सुमारे 30 मिलियन डॉलर खर्च झाल्याचं सांगितलं जातं. जगभरातील बॉक्स ऑफिसवर त्याने जवळपास 130 मिलियन डॉलरची कमाई केली. IMDb वर या सिनेमाला 4.8/10 रेटिंग मिळालं आहे. चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाला आवडेलच असं नाही. पण भूतबाधा, रहस्य आणि अंधाऱ्या वातावरणाच्या कथा आवडणाऱ्यांसाठी तो पाहण्यासारखा पर्याय ठरू शकतो.

OTT वर कुठे पाहायचा?

थिएटरनंतर या चित्रपटाचा डिजिटल प्रवास डिसेंबर 2023 मध्ये सुरू झाला. भारतात तो वेगवेगळ्या काळात विविध स्ट्रीमिंग सेवांवर उपलब्ध राहिला आहे. मात्र OTT वरील चित्रपटांची उपलब्धता बदलत असते. त्यामुळे सध्या तो नेमक्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येतो, हे पाहण्याआधी तपासून घेणं योग्य ठरेल. हस्य आणि हॉररचा अनुभव घ्यायचा असेल तर हा सिनेमा वॉचलिस्टमध्ये ठेवता येईल. पण एक गोष्ट नक्की. दिवे बंद करून एकट्याने पाहण्याआधी थोडी हिंमत सोबत ठेवावी लागेल!

Web Title: The exorcist believer movie review a chilling horror story of two missing girls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • best horror movies
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन
1

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
2

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा
3

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
4

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.