Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Paradise Teaser : नॅचरल स्टार नानीचा मोठा धमाका! ‘द पॅराडाइज’चा बहुप्रतीक्षित टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज

The Paradise Teaser : नॅचरल स्टार नानी आणि दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांची जोडी पुन्हा एकदा 'द पॅराडाइज' या बहुप्रतीक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटातील 'आया शेर' या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातल्यानंतर, आता या चित्रपटाचा १ मिनिट ३५ सेकंदांचा धडकी भरवणारा टीझर या तारखेला प्रदर्शित होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 01, 2026 | 01:28 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नॅचरल स्टार नानीचा मोठा धमाका!
  • ‘द पॅराडाइज’चा टीझर ‘या’ दिवशी रिलीज
  • ८ भाषांमध्ये चित्रपट होणार रिलीज
The Paradise Teaser : 2026 मधील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘द पॅराडाइज’ने आपल्या दमदार चर्चेचा वेग कायम ठेवला आहे. नॅचरल स्टार नानीवर चित्रित झालेले या चित्रपटातील ब्लॉकबस्टर गाणे ‘आया शेर’ आधीच चार्टबस्टर ठरले आहे. तर चित्रपटाच्या अनाउन्समेंट व्हिडिओनेही आपल्या बोल्ड आणि रॉ शैलीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेषतः त्या दमदार संवादाने, ज्यामध्ये मुख्य पात्राला एका वेश्येचा मुलगा म्हटले जाते आणि तीच गोष्ट त्याच्या हातावरही लिहिलेली दिसते! सध्या उत्सुकता लागली आहे की कधी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज ( The Paradise Teaser )  होतोय ? तर नुकतीच यासंबंधीत बातमी समोर आली आहे.

Salman Khan Post: ‘I love you baba!’; संजय दत्तला मिठी मारत सलमान खान झाला भावूक, नेमकं काय घडलं?

सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक

द पॅराडाइज हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक बनला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नॅचरल स्टार नानी मुख्य भूमिकेत दिसणार असून, दमदार फर्स्ट लूक पोस्टर्स, प्रभावी प्रमोशनल मटेरियल आणि पॉवरफुल संगीतामुळे हा चित्रपट सतत चर्चेत आहे. दसराच्या ब्लॉकबस्टर यशानंतर नानी आणि दिग्दर्शक श्रीकांत ओडेला ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत असल्याने द पॅराडाइज 2026 मधील सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

The Paradise Teaser.
August 6th. pic.twitter.com/EzJwA8AdTr
— Srikanth Odela (@odela_srikanth) July 31, 2026

चार्टबस्टर गाणे ‘आया शेर’ने सोशल मीडियावर धुमाकुळ

चित्रपटातील चार्टबस्टर गाणे ‘आया शेर’ने यूट्यूबवर 20 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवत इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे आणि एक सांस्कृतिक फिनॉमेनन बनला आहे. आता प्रेक्षकांचे लक्ष चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित टीझरकडे लागले असून, तो 6 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा टीझर आतापर्यंतची सर्वात धक्कादायक झलक ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून, चित्रपटाचा बोल्ड आणि रॉ अंदाज आणखी प्रभावीपणे समोर आणेल आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवेल.

टीझरची दमदार झलक शेअर

दिग्दर्शकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टीझरची दमदार झलक शेअर करत केली आहे. या संबंधित पोस्ट शेअर करताना त्यांनी या चित्रपटाच्या टीझर संबंधित तारीख देखील समोर आणली आहे.  “द पॅराडाइजचा टीझर ६ ऑगस्ट” असं लिहीत त्यांनी तारीखबाबत खुलासा केला आहे. निर्मात्यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही दमदार झलक शेअर करत लिहिले. १ मिनिट ३५ सेकंदांचा वेडेपणा तयार आहे. #TheParadise चा टीझर ६ ऑगस्टला प्रदर्शित होणार. जादल ज़माना साठी सज्ज व्हा. असं म्हणत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

यशासोबतच गाण्याला 18 लाख लाइक्स

या शानदार यशासोबतच या गाण्याला यूट्यूबवर 18 लाख लाइक्स ही मिळाले आहेत, जे प्रेक्षकांमधील त्याच्या अफाट लोकप्रियतेची साक्ष देतात. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपासून सोशल मीडियापर्यंत ‘आया शेर’ची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत असून, या गाण्याने द पॅराडाइज बद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

कधी होणार प्रदर्शित?

एसएलव्ही सिनेमाजच्या बॅनरखाली तयार झालेला द पॅराडाइज 21 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, इंग्रजी, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा एकूण आठ भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. जागतिक प्रेक्षकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी निर्मात्यांनी हॉलिवूड स्टार रायन रेनॉल्ड्स यांच्याशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चित्रपट सादर करण्यासाठी संपर्क साधला आहे. दमदार दिग्दर्शक, प्रभावी स्टारकास्ट आणि भव्य दृष्टिकोनामुळे ‘द पॅराडाइज हा केवळ एक चित्रपट नसून, प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला एक भव्य सिनेमॅटिक अनुभव ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत मोठा अपघात! डॉक्टरांनी दिला ‘इतके’ आठवडे बेडरेस्टचा सल्ला; नेमकं काय घडलं?

Web Title: The paradise teaser natural star nani released august 6 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • Entertainment News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.