Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’चं ‘जय दुर्गा’ भक्तिगीत रिलीज; माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा जयघोष

The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’ मालिकेतील ‘जय दुर्गा’ हे भव्य भक्तिगीत रिलीज झालं आहे. श्रेयस प्रशांत पुराणिक, राजा हसन, अल्तमश फरीदी आणि दिव्या कुमार यांच्या आवाजाने गाणं सजलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 21, 2026 | 01:24 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

The Revolutionaries: सध्या सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत अशातच आता टी-सीरीजने प्राइम व्हिडीओच्या बहुप्रतीक्षित ‘द रेव्होल्यूशनरीज’ या मालिकेतील भव्य भक्तिगीत ‘जय दुर्गा’ प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा गौरव करणाऱ्या या गाण्यात देवीच्या विविध रूपांना नमन करण्यात आलं असून, शक्ती, सामर्थ्य, संरक्षण आणि दिव्य कृपेचं आवाहन करण्यात आलं आहे.

श्रेयस प्रशांत पुराणिक यांच्या संगीताची दमदार साथ

‘जय दुर्गा’ या भक्तिगीताला श्रेयस प्रशांत पुराणिक यांनी संगीत दिलं आहे. श्रेयस प्रशांत पुराणिक, राजा हसन, अल्तमश फरीदी आणि दिव्या कुमार यांच्या दमदार आवाजाने हे गाणं अधिक प्रभावी झालं आहे. सिद्धार्थ-गरिमा वाहल यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.

गाण्यात माँ दुर्गेला सर्वोच्च शक्ती आणि वाईटावर चांगल्याच्या विजयामागील ताकद म्हणून सादर करण्यात आलं आहे. भक्ती, श्रद्धा आणि भव्य संगीताचा सुंदर संगम या गाण्यात पाहायला मिळतो.

दुर्गापूजेच्या उत्सवात रंगला ‘जय दुर्गा’चा जल्लोष

दुर्गापूजेच्या भव्य उत्सवादरम्यान ‘जय दुर्गा’ हे गाणं श्रद्धा, भक्ती आणि क्रांतीचा उत्सव साजरा करतं. मालिकेतील चारही क्रांतिकारी या उत्सवात सहभागी होताना दिसतात. माँ दुर्गेला ते आपली शक्ती, धैर्य आणि विश्वासाचा स्रोत मानतात.

कृति महेश यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या म्युझिक व्हिडीओमध्ये भक्ती आणि उत्साहाने भारलेलं भव्य दृश्यरूप पाहायला मिळतं.

स्वातंत्र्यलढ्याची अनकही कथा सांगणार ‘द रेव्होल्यूशनरीज’

‘द रेव्होल्यूशनरीज’ या मालिकेचं दिग्दर्शन आणि निर्मिती निखिल आडवाणी यांनी केली आहे. एम्मे एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली मोनिशा आडवाणी आणि मधु भोजवानी यांनी या हाय-ऑक्टेन पीरियड ड्रामाची निर्मिती केली आहे.

सत्य घटनांपासून प्रेरित असलेली ही मालिका भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची एक अनकही कथा सिनेमॅटिक पद्धतीने मांडणार आहे. ही मालिका संजीव सान्याल यांच्या ‘Revolutionaries: The Other Story of How India Won Its Freedom’ या पुस्तकावर आधारित आहे.

संयुक्ता चावला शेख, अक्षिता वधवाना, शोभित नारंग आणि रुत्वी मेहता यांनी मालिकेची कथा लिहिली आहे. भुवन बाम, रोहित सराफ, प्रतिभा रांटा आणि गुरफतेह पीरजादा प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार असून, जेसन शाह, पाओली दाम आणि तोता रॉय चौधरी हे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.

 

Yad Lagla Song: ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम पूजा चव्हाणचा नवा अंदाज; आकाश यादवसोबतचं ‘याड लागलं’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सर्व प्रमुख म्युझिक प्लॅटफॉर्मवर गाणं उपलब्ध

माँ दुर्गेच्या उग्र आणि ममतामयी अशा दोन्ही रूपांना नमन करणारं ‘जय दुर्गा’ हे भक्तिगीत सणासुदीच्या वातावरणासाठी खास ठरत आहे. भक्ती, संगीताची भव्यता आणि उत्साह यांचा सुरेल मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो.

‘जय दुर्गा’ हे गाणं सर्व प्रमुख म्युझिक प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असून, त्याचा म्युझिक व्हिडीओ टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येईल.

Adinath Kothare: ‘रामायण’नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग-बजेट सिनेमात वर्णी; साकारणार खास भूमिका

Web Title: The revolutionaries jai jai durga devotional song released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Song
  • Prime Video

संबंधित बातम्या

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित
1

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
2

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
3

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
4

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.