Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tumbbad Movie:‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज

Tumbbad Movie:‘तुम्बाड’ हा केवळ एक सिनेमा न राहता प्रेक्षकांसाठी एक कल्ट फ्रँचायझी बनला आहे. आजही या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही, याची प्रचिती यंदाच्या गणेशोत्सवात आली.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 15, 2026 | 04:00 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Tumbbad Movie: अभिनेता सोहम शाह यांच्या ‘तुम्बाड’ चित्रपटाने रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. अनोखी कथा, भयावह वातावरणनिर्मिती, दमदार अभिनय आणि अप्रतिम व्हिज्युअल एस्थेटिक्स यामुळे या चित्रपटाने देश-विदेशात मोठा कल्ट फॉलोइंग निर्माण केला. त्यामुळे ‘तुम्बाड’ हा केवळ एक सिनेमा न राहता प्रेक्षकांसाठी एक कल्ट फ्रँचायझी बनला आहे. आजही या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही, याची प्रचिती यंदाच्या गणेशोत्सवात आली.

अनेक शहरांमध्ये ‘तुम्बाड’च्या थीमवर गणपती मंडप

गणेश चतुर्थीच्या पवित्र सणानिमित्त देशभरातील अनेक ठिकाणी ‘तुम्बाड’च्या थीमवर आधारित आकर्षक गणपती मंडप साकारण्यात आले आहेत. सोशल मीडियावर या मंडपांचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ‘तुम्बाड’च्या चाहत्यांनी आपल्या कल्पकतेतून चित्रपटातील भयावह जग गणेशोत्सवाच्या सजावटीत उतरवल्याचे पाहायला मिळत आहे.

या मंडपांमध्ये चित्रपटातील प्रसिद्ध हस्तरच्या व्यक्तिरेखेपासून प्रेरित सजावट, लाल रंगाच्या भयावह भिंती, प्रवेशद्वारावर भांड्यासारखी वस्तू हातात घेतलेली देवीची मूर्ती आणि गणेशमूर्तीच्या मागील बाजूस उभं केलेलं भीतीदायक वातावरण लक्ष वेधून घेत आहे. काही ठिकाणी ‘तुम्बाड’च्या जगाची आठवण करून देणारे भयावह कॉरिडॉर आणि सेटसदृश रचना साकारण्यात आल्या आहेत.

2024 मध्ये री-रिलिजनंतरही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुम्बाड’ने आपल्या लोककथांवर आधारित कथानक आणि वेगळ्या मांडणीमुळे हळूहळू मोठा चाहतावर्ग निर्माण केला. विशेष म्हणजे 2024 मध्ये चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा आणखी मोठा प्रतिसाद मिळाला. री-रिलिजनंतर ‘तुम्बाड’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आपल्या पहिल्या प्रदर्शनापेक्षाही अधिक प्रेक्षकांना आकर्षित केलं.

या यशामुळे चित्रपटाची लोकप्रियता केवळ जुन्या चाहत्यांपुरती मर्यादित नसून नव्या पिढीतही ‘तुम्बाड’ची क्रेझ कायम असल्याचं दिसून आलं.

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज

‘तुम्बाड 2’ची उत्सुकता शिगेला

दरम्यान, ‘तुम्बाड’च्या आगामी सिक्वेलचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘तुम्बाड 2’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री झाल्यानंतर चित्रपटाची चर्चा आणखी वाढली. त्यात आता अभिनेत्री आलिया भट्टदेखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

अभिनेता-निर्माता सोहम शाह यांनी जुलैमध्ये या महत्त्वपूर्ण कास्टिंगची घोषणा केली होती. त्यामुळे सोहम शाह, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया भट्ट हे कलाकार या बहुप्रतीक्षित फ्रँचायझीच्या पुढील अध्यायात एकत्र दिसणार आहेत.

‘तुम्बाड’च्या थीमवर गणपती मंडप साकारण्यापासून ते ‘तुम्बाड 2’बद्दल वाढणाऱ्या उत्सुकतेपर्यंत, या फ्रँचायझीचा चाहतावर्ग किती मोठा आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

F.I.R. NO. 469 Movie: अभिनेता किरण गायकवाडचे दिग्दर्शनात पदार्पण, ‘F.I.R. NO. 469’मधून मांडणार कॉमन मॅनची गोष्ट

Web Title: Tumbbad movie ganpati mandap theme tumbbad 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?
1

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका
2

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज
3

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश
4

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.