Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य

झी5वरील 'सरवगुणसंपन्न' या चित्रपटात वाणी कपूर आणि इश्वाक सिंह प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना वाणी कपूरने ही कथा प्रत्येकाला आपलीशी वाटेल, असे म्हटले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 24, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sarvagunn Sampanna Movie:  झी5 हिंदीने आपल्या दमदार कंटेंट लाइनअपमध्ये आणखी एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाची भर घालत ‘सरवगुणसंपन्न’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. मॅडॉक फिल्म्सच्या सहकार्याने तयार झालेल्या या चित्रपटात वाणी कपूर आणि इश्वाक सिंह प्रमुख भूमिकेत असून, दिग्दर्शन सोनाली रतन देशमुख यांनी केले आहे.

1990 च्या दशकातील एका छोट्या शहराच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट एका तरुणीची कथा सांगतो, जिचा चेहरा एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रौढ चित्रपट अभिनेत्रीशी साधर्म्य असल्यामुळे समाज तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहू लागतो. या पूर्वग्रहांचा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर, विशेषतः लग्नाच्या शक्यतांवर आणि समाजातील स्वीकारावर परिणाम होतो.

महिलांवर लादल्या जाणाऱ्या सामाजिक अपेक्षा, ओळख, आत्मस्वीकार आणि स्वतःचं व्यक्तिमत्त्व जपण्याचा संघर्ष या विषयांना विनोद, नॉस्टॅल्जिया आणि भावनिक प्रसंगांच्या माध्यमातून चित्रपटात मांडण्यात आलं आहे. रूढ कल्पनांना प्रश्न विचारणारी आणि वेगळा दृष्टिकोन मांडणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी ठरणार आहे.

चित्रपटाविषयी बोलताना वाणी कपूर म्हणाली, “सरवगुणसंपन्नकडे मला सर्वप्रथम आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्याची वेगळी, मनाला भिडणारी आणि आजच्या काळाशी जोडलेली मध्यवर्ती कल्पना. हा चित्रपट आपल्या ओळखीचा, समाज आपल्यावर लादत असलेल्या लेबल्सचा आणि स्वतःचं खरं अस्तित्व शोधण्याच्या प्रवासाचा आहे.”

“आमदार फुटू नयेत म्हणून..”, NEET पेपरफुटीप्रकरणी अभिनेता अक्षय केळकरचा सरकारला थेट सवाल, पोस्ट करत म्हणाला…

ती पुढे म्हणाली, “हा विषय अतिशय उबदारपणे, संवेदनशीलतेने आणि हलक्याफुलक्या विनोदातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट मनोरंजक तर आहेच, पण प्रेक्षकांना विचार करायलाही भाग पाडतो. ताज्या, अर्थपूर्ण आणि प्रत्येकाला आपलीशी वाटणाऱ्या या कथानकाचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे.”

वाणी कपूरचा यापूर्वी कधीही न पाहिलेला वेगळा अवतार आणि सामाजिक संदेश देणारं कथानक यामुळे ‘सरवगुणसंपन्न’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता आहे.

Kissing Controversy: किसिंग वादानंतर अभिजीत भट्टाचार्यांनी उदित नारायण यांना दिला होता खास सल्ला; वर्षभरानंतर केला मोठा खुलासा

Web Title: Vaani kapoor begins a new ott chapter on zee5 set to play a never seen before role in sarvagun sampanna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • zee5

संबंधित बातम्या

Suniel Shetty: सुनील शेट्टींच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘कल्चरल आयकॉन ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित
1

Suniel Shetty: सुनील शेट्टींच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘कल्चरल आयकॉन ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित

Bigg Boss: ‘बिग बॉस’ रचणार इतिहास! एकाच रात्री ६ भाषांमध्ये होणार ग्रँड लॉन्च; सलमानसह ‘हे’ स्टार होस्ट सज्ज
2

Bigg Boss: ‘बिग बॉस’ रचणार इतिहास! एकाच रात्री ६ भाषांमध्ये होणार ग्रँड लॉन्च; सलमानसह ‘हे’ स्टार होस्ट सज्ज

Poonam Pandey :’वेश्याव्यवसाय लीगल करा..’, पूनम पांडेच्या वक्तव्याने खळबळ, एडल्ट कंटेंटबाबतही केलं मोठं विधान
3

Poonam Pandey :’वेश्याव्यवसाय लीगल करा..’, पूनम पांडेच्या वक्तव्याने खळबळ, एडल्ट कंटेंटबाबतही केलं मोठं विधान

Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरची ‘कृष्णार्पण सिरीज’द्वारे जन्माष्टमीची खास भेट; तीन कव्हर्ससह ‘मनमोहन कृष्णा’ची सुरेल मेजवानी
4

Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरची ‘कृष्णार्पण सिरीज’द्वारे जन्माष्टमीची खास भेट; तीन कव्हर्ससह ‘मनमोहन कृष्णा’ची सुरेल मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.