Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi: नवा ट्विस्ट! ‘ग्रीन फ्लॅग’ लिस्टमधले गुण केदार पूर्ण करणार का? केदार-तारिणीच्या नात्यात जवळीक वाढणार

तारिणी मालिका सध्या रंजक वळणावर आहे. केदार तर तारिणीच्या प्रेमात आहेच पण आता तारिणीही केदारच्या प्रेमात पडणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. कारण केदारसारखा ग्रीन फ्लॅग तारिणीसाठीच आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 26, 2026 | 12:23 PM
तारिणी केदारच्या प्रेमात पडणार का

तारिणी केदारच्या प्रेमात पडणार का

Follow Us
Follow Us:
  • तारिणीच्या ग्रीन फ्लॅग लिस्टमधले सर्व गुण केदार पूर्ण करणार का?
  • तारिणीही पडणार का केदारच्या प्रेमात?
  • दोघांमधील प्रेम फुलणार का? 
लोकप्रिय मालिका ‘तारिणी’ प्रेक्षकांना दर आठवड्याला नव्या वळणांनी खिळवून ठेवत आहे. आता मालिकेत एकीकडे ऑर्गन ट्रॅफिकिंग मिशन रंगणार असून दुसरीकडे केदार आणि तारिणीच्या नात्यात हळूहळू उमलणाऱ्या भावना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. टीम तारिणी एका नव्या मिशनवर निघाली आहे. शहरात सुरू असलेल्या ऑर्गन ट्रॅफिकिंग रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी रेवाला युवराजकडून माहिती मिळवायची आहे. त्यांना समजत की युवराजला रेव्ह पार्टीच्या लोकेशनबद्दल माहिती आहे. त्यासाठी रेवा युवराजला भेटायला जाणार आहे. रेवाचा हा प्लॅन यशस्वी होणार का? आणि या मिशनमध्ये टीम तारिणीला कोणते नवे धक्कादायक खुलासे मिळणार? याची उत्सुकता आता वाढली आहे. दुसऱ्या बाजूला केदारच्या आयुष्यात प्रेमाची चाहूल लागली आहे. त्याला आवडणारी मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून तारिणीच आहे, हे तो रेवाला सांगतो. मात्र तारिणीला आपल्या भावना कशा सांगायच्या, त्याने लिहिलेलं  प्रेमपत्र तिला कसं द्यायचं याची चिंता केदारला सतवत आहे. 

Tarini Serial New Promo: गुलाब आणि युवराजला पकडण्यासाठी नवा सापळा; तारिणी आणि टीमला प्लॅन यशस्वी होणार का ? पाहा प्रोमो

तारिणीचे ग्रीन फ्लॅग  

दरम्यान, तारिणी तिच्या आयुष्याच्या जोडीदारामध्ये असावेत असे पाच “ग्रीन फ्लॅग” गुण रेवाला सांगते. त्यामध्ये “माझ्यासाठी उभा राहणारा”, “बाईपण जपणारा” , “मनातलं जाणून घेणारा नाही तर मनातलं सांगणारा हवा” आणि “माझ्यासोबत माझ्या कुटुंबालाही स्वीकारणारा” असे गुण आहेत. विशेष म्हणजे केदारने यातील काही गुण आधीच आपल्या वागण्यातून सिद्ध केले आहेत. घरातील वादाच्या वेळी त्याने तारिणीची ठाम बाजू घेतली होती. तसेच स्त्रियांचा आदर करणारा आणि बाईपण जपणारा त्याचा स्वभावही तारिणीच्या मनाला भावला आहे. येत्या भागांमध्ये आणखी काही प्रसंगांमधून केदार तारिणीच्या मनात आपली खास जागा निर्माण करताना दिसणार आहे.

तारिणी केदार केमिस्ट्री

आतापर्यंत केदार कायम तारिणीच्या प्रेमात आहे हे दिसून आलं आहे. आता रेवाच्या येण्याने तारिणीलाही केदारवर तिचं प्रेम आहे हे उमगणार आहे का? केदारमध्ये तारिणीला असणारे सर्व गुण आहेत पण तरीही तिने अजून त्याचा कधीही विचार केला नाही हेच अनेकांना खटकत आहे. केदारचं तिच्यावरील प्रेम हे संपूर्ण टीमलाही माहीत आहे. पण तारिणी नक्की कधी आणि कशी केदारच्या प्रेमात पडणार याचीच आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. आता तारिणीला जाणवेल का की केदारच तिच्या मनातल्या जोडीदाराच्या कल्पनेत बसतो? टीम तारिणीचं मिशन यशस्वी होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी खरं तर प्रेक्षकांनी मालिकाच पहायला हवी. 

Tarini Serial : “माझ्या मनात भिती होती त्यांचे डोळे…” ; अनंत जोग यांच्याबाबत अभिज्ञा भावेनी सांगितला सेटवरचा ‘तो’ किस्सा

Web Title: Zee marathi new twist in tarini will kedar be fit in green flag list of tarini love will bloom between two

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • marathi serial update
  • zee marathi

संबंधित बातम्या

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका
1

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका

Marathi Serial: ‘Mohini – Premachi Filmy Kahaani’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! प्रतापरावचा सुडबुद्धीचा डाव, मोहिनीवर थेट गोळीबार!
2

Marathi Serial: ‘Mohini – Premachi Filmy Kahaani’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! प्रतापरावचा सुडबुद्धीचा डाव, मोहिनीवर थेट गोळीबार!

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट
3

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार
4

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.