Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Zee Marathi artists Ganeshotsav:गणेशोत्सवाच्या निमित्ताने झी मराठीवरील कलाकारांनी आपल्या घरच्या बाप्पाच्या आठवणी आणि खास अनुभव शेअर केले आहेत. अभिनेता रोहित परशुराम याच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव खास आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 19, 2026 | 03:20 PM
Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रोहितच्या तीन वर्षांच्या मुलीने रुईने बाप्पासाठी स्वतः आरास तयार केली.
  • भोर येथे कुटुंबासोबत रोहितचा गणेशोत्सव; यंदा उत्सव साधेपणाने साजरा होणार.
  • दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनानंतर जिमचे साहित्य विकले गेल्याचा खास अनुभव रोहितने सांगितला.
गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा सण. बाप्पा आले की घरात वेगळाच आनंद येतो. आरास, मोदक, आरत्या आणि सगळं कुटुंब एकत्र. प्रत्येकाच्या घरी बाप्पा साजरा करण्याची पद्धत वेगळी असते पण भावना एकच असते. झी मराठीवरील कलाकारांनी पण त्यांच्या घरच्या गणपतीबद्दल, त्यांच्या आठवणींबद्दल सांगितलं आहे.

रोहित परशुराम – कृष्णाईच्या लेकी मधला शंकर

रोहितसाठी यंदाचा गणपती खूप स्पेशल आहे. कारण त्याची तीन वर्षाची मुलगी रुई. रुईला आता सगळं कळायला लागलंय. तिने यंदा बाप्पाच्या येण्याआधी 15 दिवस आधीच तयारी सुरू केली आहे. एका पुठ्ठ्यावर चिकणमाती, फुलं लावून तिने स्वतः बाप्पासाठी डेकोरेशन बनवलं आहे. “बाप्पा येणार आहेत, त्यांच्यासमोर हे ठेवायचंय” असं तिनेच ठरवलंय. हे पाहून रोहित खूप खुश आहे. Zee Marathi artists Ganeshotsav:

रोहितचा गणपती दरवर्षी भोरला येतो. तिथे त्याचे आई वडील असतात. सगळं कुटुंब एकत्र येऊन सण साजरा करतात. पण यावर्षी काही महिन्यांपूर्वी त्याचे काका वारले, त्यामुळे मोठा उत्सव नसेल पण मनापासून साजरा करणार आहेत.

रोहितने दगडूशेठ बाप्पाबद्दल एक भारी अनुभव पण सांगितला. 2019 मध्ये त्याने पुण्यातली आपली जिम बंद करून अभिनयात यायचं ठरवलं. जिममध्ये 5-6 लाखाचं सामान होतं आणि एका आठवड्यात जागा खाली करायची होती. ते सामान विकणं शक्य नव्हतं. खूप टेन्शन आलं होतं. त्यावेळी त्याच्या बायकोने सांगितलं की एकदा बाप्पाला जाऊन सांगून ये. तो गेला, दर्शन घेतलं आणि बाप्पाला म्हणाला की मला यातून बाहेर काढ. आणि काय आश्चर्य, चौथ्या दिवशीच त्याच्या जिमचा एक विद्यार्थी जो सासवडला नवीन जिम टाकत होता, त्याने सगळं सामान विकत घेतलं. रोहित म्हणतो की तो बाप्पाचाच चमत्कार होता.

प्राप्ती रेडकर – सावळ्याची जणू सावली मधली सावली

प्राप्ती ही कोकणातली आहे. तिचं गाव आहे मालवणमधलं वैंगणी. दरवर्षी ती गणपतीसाठी गावी जाते. तिथे 11 दिवस गणपती असतो. यंदा पण ती 5-6 दिवस गावी असणार आहे. यावर्षी तिने बाप्पासाठी खास ‘रेडकरांचा बाप्पा’ अशी नेमप्लेट बनवून घेतली आहे. प्राप्ती सांगते की गावच्या गणपतीची मजा काही वेगळीच असते. रात्री जेवण झाल्यावर सगळे एकत्र बसून भजन करतात. तिचे काका सचिन रेडकर भजनी बुवा आहेत आणि तिचे बाबा पण गायक आहेत. त्यामुळे घरात भजनाची धमाल मैफल जमते. तिथली एक परंपरा तिला खूप आवडते. आंघोळ झाल्यावर अंगणातून किंवा रानातून बाप्पासाठी ताजी दुर्वा आणायची. याला ते ‘परडा’ म्हणतात. त्यासोबत शमीची पानं पण आणतात आणि मग पूजा करतात.

Chakra Upcoming Movie: पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा! ‘मृत्यूचक्र’ची रहस्यमय झलक प्रदर्शित

मुंबईत आल्यावर पण ती सार्वजनिक गणपतींचं दर्शन घेते. सगळ्यात आधी डोंगरीचा राजा, उमरखाडीचा राजा, मग चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा, परळचा राजा या सगळ्यांचं दर्शन ती घेते. बाप्पा विघ्नहर्ता आहे, तो सगळ्या संकटातून बाहेर काढतो अशी तिची श्रद्धा आहे.

शिवानी सोनार – तारिणी

पुण्यात वाढलेल्या शिवानीसाठी गणेशोत्सव हा सगळ्यात आवडता सण आहे. तिच्या माहेरी 10 दिवस गणपती असतो आणि सासरी दीड दिवसाचा गणपती असतो. दोन्हीकडे ती आनंदाने सण साजरा करते. पुण्याची असल्यामुळे तिने एक नियम केलाय की मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घ्यायचंच. शूटिंगमधून वेळ काढून ती ते दर्शन घेते. तिला बाप्पाची आरास करायला खूप आवडतं. वेळ नसला तरी ती ऑनलाईन शॉपिंग करून आयडिया देत असते. तिच्या माहेरी एक परंपरा आहे की बाप्पाची मूर्ती तीच निवडते. हे काम आता तिचंच झालंय. तिला वेगवेगळ्या मूर्तीकारांच्या स्टॉलवर जाऊन मूर्ती बघायला खूप आवडतं. प्रत्येक मूर्तीचे हावभाव वेगळे असतात.

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

यंदा तिने एक नवीन गोष्ट ठरवली आहे. तिला तळणीचे मोदक छान जमतात पण उकडीचे मोदक फारसे जमत नाहीत. त्यामुळे यावर्षी ती तिच्या सासूबाईंकडून उकडीचे मोदक शिकणार आहे.तिघांच्या पण गोष्टी वेगळ्या आहेत पण सगळ्यांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे बाप्पावरचं प्रेम, कुटुंबासोबतचा आनंद आणि आपल्या परंपरेचा अभिमान.

Web Title: Zee marathi rohit parshuram ganpati celebration daughter rui

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Ganesh Chaturthi 2026
  • Marathi News
  • zee marathi

संबंधित बातम्या

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च
1

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?
2

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
3

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Chakra Upcoming Movie: पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा! ‘मृत्यूचक्र’ची रहस्यमय झलक प्रदर्शित
4

Chakra Upcoming Movie: पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा! ‘मृत्यूचक्र’ची रहस्यमय झलक प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.