Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शूटिंगच्या सेटवर जुळली खास मैत्री; Zee Marathiवरील कलाकारांनी शेअर केल्या मनातल्या आठवणी

Zee Marathi: 'कमळी' मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी विजया बाबर हिने सांगितलं की, मालिकेच्या संपूर्ण टीमसोबत तिचं उत्तम नातं आहे. मात्र साक्षी आणि निखिल यांच्याशी तिची विशेष मैत्री झाली आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच साक्षी तिच्यासोबत असल्यामुळे दोघींचा एकमेकांवर मोठा विश्वास आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 01, 2026 | 04:21 PM
Zee Marathi: शूटिंगच्या सेटवर जुळली खास मैत्री (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Zee Marathi: शूटिंगच्या सेटवर जुळली खास मैत्री (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Zee Marathi Serial Actress : टिव्ही मालिकांचं शूटिंग म्हणजे फक्त कॅमेरा, लाईट आणि संवाद एवढंच नसतं. तर दिवसातील अनेक तास एकत्र काम करताना कलाकारांमध्ये आपोआप जिव्हाळा निर्माण होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत सुरु असलेल्या चित्रीकरणात एकत्र मेहनत, गप्पा, जेवण, मस्ती आणि एकामेकांना दिलेली साथ यामुळे अनेक नाती अधिक घट्ट होतात. काही सहकलाकार पुढे जाऊन कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जवळचे होतात. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने झी मराठीवरील काही लोकप्रिय कलाकारांनी सेटवर जुळलेल्या या खास मैत्रीबद्दल मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या.

‘कमळी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी विजया बाबर हिने सांगितलं की, मालिकेच्या संपूर्ण टीमसोबत तिचं उत्तम नातं आहे. मात्र साक्षी आणि निखिल यांच्याशी तिची विशेष मैत्री झाली आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच साक्षी तिच्यासोबत असल्यामुळे दोघींचा एकमेकांवर मोठा विश्वास आहे. कामाच्यावेळी असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील एखादा प्रसंग, दोघी कायम एकमेकींच्या पाठीशी उभ्या असतात. कधी साक्षीला एखाद्या दृश्याची चिंता वाटली किंवा ती अस्वस्थ झाली तर विजया तिला धीर देते. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्यांचं नातं दिवसेंदिवस अधिक मजबूत झालं आहे.

साक्षी आणि निखिल यांच्याशी तिची विशेष मैत्री

‘कमळी‘ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी विजया बाबर हिने सांगितले की, मालिकेच्या संपूर्ण टीमसोबतच तिचं उत्तम नातं आहे. मात्र साक्षी आणि निखिल यांच्याशी तिची विशेष मैत्री झाली आहे. मालिकेच्य सुरुवातीपासूनच साक्षी तिच्यासोबत असल्यामुळे दोघींचा एकामेकांवर मोठा विश्वास आहे. कामाच्यावेळी असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील एखादा प्रसंग, दोघी कायम एकामेकींच्या पाठीशी उभ्या असतात. कधी साक्षीला एखाद्या दृश्याची चिंता वाटली किंवा ती अवस्थ झाली तर विजया तिला धीर देते. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्यांचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत जात.

कामाची जागा नसून  दुसरं घर बनलं

निखिलबद्दल बोलताना विजयाने सांगितलं की, त्याच्या विनोदी स्वभावामुळे सेटवर नेहमी आनंदाचं वातावरण असतं. थोडा वेळ मिळाला की सगळे मिळून गप्पा मारतात, खाण्याचा आनंद घेतात आणि दिवसातील थकवा विसरून जातात. त्यामुळे शूटिंगचं ठिकाण आता तिच्यासाठी कामाची जागा नसून दुसरं घर बनलं आहे.

मालिकेमुळे ते आणखी मजबूत

‘शुभ श्रावणी’ मालिकेतील वल्लरी विराजनेही तिच्या खास मैत्रिणीबद्दल सांगितलं. मालिकेत स्वीटीची भूमिका करणारी भूमिजा पाटील ही तिची सर्वात जवळची मैत्रीण असल्याचं तिने सांगितलं. दोघींनी याआधीही एकत्र काम केलं असल्यामुळे त्यांचं नातं आधीपासूनच घट्ट होतं. आता या मालिकेमुळे ते आणखी मजबूत झालं आहे. मोठे संवाद पाठ करताना, कठीण दृश्यांची तयारी करताना किंवा एखाद्या प्रसंगात अडचण आली तर त्या एकमेकींना मदत करतात.

एकत्रच शूटिंगला येतात आणि एकत्रच परततात

शूटिंगदरम्यान संध्याकाळच्या वेळेला कॉफी आणि चॉकलेटचा छोटासा ब्रेक हा त्यांच्या दिवसातील आवडता क्षण असतो. त्या दोघींना संगीताचीही आवड असल्यामुळे मेकअप रूममध्ये गाणी ऐकणं, हसत-खेळत वेळ घालवणं आणि कधी अचानक नाचायला सुरुवात करणं हे नेहमीच सुरू असतं. अनेकदा त्या एकत्रच शूटिंगला येतात आणि एकत्रच परततात. त्यामुळे एखाद्या दिवशी भूमिजा सेटवर नसली की काहीतरी कमी असल्याची भावना वल्लरीला होते.

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील प्राप्ती रेडकरने तिच्या दोन खास मैत्रिणींची नावं घेतली. भाग्यश्री दळवी आणि मेघा धाडे या दोघी तिच्यासाठी केवळ सहकलाकार नाहीत, तर जवळच्या मैत्रिणी आहेत. सध्या तिघींचं एकत्र शूटिंग कमी होत असल्यामुळे त्यांची आठवण सतत येते, असं प्राप्तीने सांगितलं. मोकळा वेळ मिळाला की त्या तिघी मिळून रील्स तयार करतात, खेळ खेळतात, गप्पा मारतात, आवडते पदार्थ खातात आणि भरपूर हसतात.

Aishwarya Narkar: भूमिका पडली महाग! “ही बाई मरत का नाही” म्हणत ऐश्वर्या नारकर यांना पडल्या शिव्या

एकमेकींशी भिडताना दिसतात

प्राप्तीच्या मते, भाग्यश्री आणि मेघा या दोघी तिची खूप काळजी घेतात. कामाबरोबरच आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहायला त्यांनीच शिकवलं. मालिकेत त्यांच्या व्यक्तिरेखा एकमेकींशी भिडताना दिसतात, पण कॅमेरा बंद झाला की त्यांच्यातील मैत्री सर्वांनाच हेवा वाटावा अशी असते. अनेकदा त्या शूटिंगनंतरही एकत्र वेळ घालवतात आणि छोट्या भेटींचा आनंद घेतात.

Marathi Actress: “लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास…’ ; मराठमोळ्या अभिनेत्रीने अखेर व्यक्त केली मनातील खंत

प्रेक्षकांना पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका दिसतात, पण त्या भूमिकांच्या मागे अशी अनेक सुंदर नाती तयार होत असतात. एकत्र काम करताना निर्माण झालेला विश्वास, आधार आणि प्रेम हीच या कलाकारांची खरी कमाई आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने त्यांनी सांगितलेल्या या आठवणी प्रत्येकाला आपल्या जवळच्या मित्रांची आठवण करून देतात. प्रसिद्धीच्या जगातही खरी मैत्री टिकू शकते, याचं हे सुंदर उदाहरण म्हणायला हरकत नाही.

 

Web Title: Zee marathi serial actors celebrate friendship day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

Marathi Actress: “लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास…’ ; मराठमोळ्या अभिनेत्रीने अखेर व्यक्त केली मनातील खंत
1

Marathi Actress: “लग्नानंतर सासरी प्रचंड त्रास…’ ; मराठमोळ्या अभिनेत्रीने अखेर व्यक्त केली मनातील खंत

Entertainment News: ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’च्या सेटवरील खास बॉन्डिंग, 10-12 वर्षांची मैत्री पुन्हा व्हायरल
2

Entertainment News: ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’च्या सेटवरील खास बॉन्डिंग, 10-12 वर्षांची मैत्री पुन्हा व्हायरल

Shashank Ketkar : ‘कमळी’ मालिकेत शशांक केतकरची दमदार एन्ट्री; ‘रितेश सरपोतदार’च्या भूमिकेत साकारणार नवा संघर्ष
3

Shashank Ketkar : ‘कमळी’ मालिकेत शशांक केतकरची दमदार एन्ट्री; ‘रितेश सरपोतदार’च्या भूमिकेत साकारणार नवा संघर्ष

पुष्कर श्रोत्रीच्या पुढाकारातून रंगणार ‘झिम्माड’; ६० हून अधिक मराठी कलाकारांची पावसाळी पिकनिक
4

पुष्कर श्रोत्रीच्या पुढाकारातून रंगणार ‘झिम्माड’; ६० हून अधिक मराठी कलाकारांची पावसाळी पिकनिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.