प्रसिद्ध प्राचिन स्थळावर खड्ड्यात पडून IIT च्या विद्यार्थिनीचा मृत्यू; प्राध्यापक गंभीर जखमी
गुजरातमधील लोथल येथे मोठी दुर्घटना घडली. IIT-Delhi च्या विद्यार्थ्यांचं पथक संशोधनासाठी हडप्पा संस्कृती स्थळावर आलं होतं. यावेळी खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून २३ वर्षीय पीएचडी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर प्राध्यापक गंभीर जखमी असून २ विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. प्राध्यापकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. प्रसिद्ध प्राचिन स्थळावर दुर्घटना घडल्यामुळे खळबळ माजली आहे.
अपघातासंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सुरभी वर्मा (Surabhi Verma) असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती IIT-Delhi ची पीएचडीची विद्यार्थिनी होती. तर प्राध्यापक यम दीक्षित, ४५ ( Yama Dixit) गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. दरम्यान बडोदा आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने (ASI), या घटनेचा तपास करण्यासाठी एक पथक लोथल येथे पाठवलं असून त्यांचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, IIT-Delhi आणि IIT-Gandhinagar च्या संशोधक विद्यार्थ्यांची संयुक्त टीम बुधवारी गुजरातमधील लोथल येथे पॅलिओक्लायमेटोलॉजीचा (प्राचीन हवामानशास्त्र) अभ्यास करण्यासाठी गेली होती. येथे सिंधू संस्कृती म्हणजेच प्राचिन हडप्पा संस्कृतीचे अवशेषही सापडलेले आहेत. त्यामुळे देशातील वारसास्थळांमध्ये याचा समावेश आहे. शिवाय या भागात संशोधनही सुरू आहे. त्यामुळे देशभरातून विद्यार्थी आणि संशोधक संशोधनासाठी याठिकाणी येतात.
दरम्यान बुधवारी ११ च्या दरम्यान संशोधनाचे नमूने गोळा करताना खड्ड्याच्या वरच्या बाजूचा मातीचा ढिगारा या पथकांवर कोसळला. मातीच्या ढिगाऱ्यात काहीजण गाढले गेले. शिवाय खड्ड्यात पाणी होतं. त्यामुळे त्याच काहीजण अडकून पडले. त्यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर प्राधापकाची प्रकृती चिंताजनक आहे. आणकी दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.
संशोधनासंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
घटनेची माहिती मिळताच पोलीस १५ मिनिटानंतर घटनास्थळी दाखल झाले. लोथल येथील पोलीस स्टेशनपासून घटनास्थळापासून दूर आहे तर अहमदाबादपासून ७० किमीवर हे ठिकाण आहे. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं. जखमींना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. जखमी प्राध्यापकावर उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहित पोलीस अधीक्षक ओम प्रकाश जाट यांनी दिली.
दरम्यान देशातील आणि जगातील संशोधनाचं केंद्र असलेल्या ठिकाणी अशी दुर्घटना घडल्यामुळे खळबळ माजली आहे.






