'या' 4 रंगाचे तांदूळ ठरतात आरोग्यदायी, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ
तांदूळ हे भारातील प्रमुख पीक आहे. त्यामुळ देशाच्या कानाकोपऱ्यात खासकरुन महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य राज्यात भाताचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जास्त भात खाल्याने पोटाचा आकार वाढतो किंवा मधुमेहाचा त्रास जास्त होतो. त्यामुळे अनेकजण भात खाणं सोडून देतात. मात्र पुर्णत: भात खाणं सोडून देणं आरोग्यासाठी चांगले नाही. भातामध्ये असलेले पौष्टीक घटक शरीराच्या बळकटीसाठी महत्त्लाचे आहेत, जाणून काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ…
सर्वसामान्यपणे देशात आणि प्रामुख्याने राज्यात देखील पांढऱ्या रंगाच्या तांदळाचं पीक घेतलं जातं. मात्र असं असलं तरी काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणाच पांढऱ्या तांदळाव्यतिरिक्त तपकिरी, लाल आणि काळ्या रंगाच्या तांदळाचं पीक घेतलं जातं. या तांदळाचे फायदे असंख्य असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
बऱ्याचदा वजन वाढेल किंवा पोटाचा घेर जास्त वाढतो या समजूतीने अनेक जण भात खाणं सोडतात. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसारपांढऱ्या रंगाच्या तांदळाचा भात खाल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. टीऑक्सिडेंट आणि इतर आवश्यक पोषक तत्वे पांढऱ्या रंगाच्या तांदळामध्ये मुबलक प्रमाणात असतात. अशक्त माणसाच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे तळकोकण आणि गोव्यामध्ये आजारी माणसाला उकड्य़ा तांदळाची पेज प्यायला देतात. तसंच पांढऱ्य़ा रंगांचा भात पचायला हलका असतो.त्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही.
जर तुमच्य़ा शरीराला प्रोटीनची कमरता जाणवत असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या प्रोटीन मिळवण्यासाठी तपकिरी रंगाच्या तांदळाचं सेवन करु शकता. बऱ्याचदा प्रोटीन मिळवण्यासाठी अंड,मासे, चिकन खाण्य़ाचा सल्ला दिला जातो. मात्र जर तुम्ही मांसाहार खात नसाल आणि तुमच्या शरीरासाठी प्रोटीनची आवश्यकता असेल तर तुम्ही तपकिरी रंगाच्या तांदळाचा आहारात समावेश करु शकता. त्याचशिवाय या तांदळाचया सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
महिला आणि लहान मुलांमध्ये बहुतांश प्रमाणात रक्तकाची कमतरता असते. प्रसुतिदरम्यान किंवा मासिक पाळीतील अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे महिलांमध्ये अॅनिमियासारखे आजार बळावतात. म्हणूनच जर लोहाची कमतरता असेल तर आहारात लाल रंगांच्या तांदळाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर या तांदळाच्या सेवनाने झटपच वजन कमी होण्यास मदत होते. या तांदळाचा भात खाल्याने बराच वेळ भूक लागत नाही. लाल रंगाच्या तांदळात लोहाची मात्रा मोठ्या प्रमाणात असते म्हणून अॅनिमियासाख्या आजारावर हा तांदूळ गुणकारी आहे.
काळ्या रंगााच्या तांदळैाचं उत्पादन फार कमी प्रमाणात होतं. या तांदळात व्हिटॅमिन ई आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जर तुम्ही केस आणि त्वचेच्या आरोग्याची काळजी घेत असाल तर आहारात काळ्या रंगाच्या तांदळाचं समावेश नक्की करा, असं तज्ज्ञ सांगतात. काळ्या रंगाच्या तांदळामध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात असते. यानुळे यकृत आणि हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते.






