आतून बाहेरून किडनी साफ करते ही 20 रुपयांची हिरवी पावडर, अशाप्रकारे करा आहारात समावेश
आज आम्ही तुम्हाला अशा एका पावडरविषयी सांगत आहोत, ज्याचा आरोग्यासाठी फार फायदा होत असतो. नैसर्गिक गुणधर्मांनी युक्त ही पावडर तुम्ही तुमच्या आहारात आवर्जून समाविष्ट करायला हवी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नक्की कोणती पावडर आहे? तर ही आहे शेवग्याची पावडर, जिळ;या इंग्रजीत मोरिंगा पावडर असेही म्हटले जाते. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. शेवग्याच्या शेंगा हेल्दी भाज्यांमधील एक प्रसिद्ध भाजी आहे. याच्या सेवनाने पचनसंस्था सुधारते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
शेवग्याची पावडर किडनीला डिटॉक्स करण्यास मदत करते. तसेच किडनीचे कार्य सुरळीत ठेवण्यास हे महत्त्वपूर्ण काम बजावत असते. किडनीच्या निरोगी आरोग्यासाठी शेवग्याच्या पावडरचे सेवन फायद्याचे खूप फायद्याचे ठरते. चला तर मग शेवग्याच्या पावडरचे फायदे आणि याचा आहारात समावेश कसा करावा याविषयी सविस्तर जाणून घ्या.
घरच्या घरी असा करा हायड्रा फेशियल, वयाच्या 40 व्या वर्षीही त्वचा दिसेल 20 वर्ष तरुण
अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म
किडनीच्या विकारांमध्ये सूज हा एक महत्त्वाचा घटक आहे. शेवग्याच्या पावडरमध्ये आइसोथियोसायनेट्ससारखे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, हे गुणधर्म किडनीतील सूज दूर करण्यास मदत करतात. यामुळे किडनीच्या पेशींचे संरक्षण होते आणि त्याची कार्यक्षमताही सुधारते.
किडनीसाठी नैसर्गिक डिटॉक्स
शेवग्याची पावडर नैसर्गिक मूत्रवर्धक म्हणून काम करते. याच्या सेवनाने शरीरातील विषारी आणि अपायकारक घटक बाहेर टाकले जातात. यामुळे किडनीवरील ताण कमी होतो आणि किडनी स्वच्छ राहते. तसेच यामुळे डिटॉक्स प्रक्रिया सुधारते आणि किडनीचे कार्य आणखीन सुरळीत होते.
रक्तदाब नियंत्रणात राहते
किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे फार महत्त्वाचे ठरते. शेवग्याच्या पावडरमध्ये हायपोटेन्शन गुण असतात, जे रक्तदाब कमी करण्यात उपयुक्त ठरतात. रक्तदाब नियंत्रित राहिल्यामुळे किडनीवरील ताण कमी होतो आणि किडनीचे कार्य सुधारते.
या भाज्या खाल्ल्यामुळे झटपट कमी होईल वजन, आजच आहारात करा समावेश, टॉयलेटमध्ये बसताच पोट होईल साफ
शेवग्याच्या पावडरचा आहारात अशाप्रकारे करा समावेश
पराठे बनवा
गव्हाच्या पिठात शेवग्याची पावडर मिसळून तुम्ही याचा पराठा तयार करू शकता आणि आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करू शकतो
सॅलडमध्ये करा समावेश
तुम्ही हिरव्या भाज्यांच्या किंवा फळांच्या सॅलडमध्ये शेवग्याची पावडर मिसळून याचे सेवन करू शकता
गरम पाण्यासोबत प्या
एक कप गरम पाण्यात शेवग्याची पावडर मिसळा आणि एक पेय म्हणून याचे सेवन करा
भाजीत करा वापर
तुम्ही रोजच्या भाज्यांमध्येही शेवग्याची पावडर मिक्स करून याचे सेवन करू शकता