हिवाळा ऋतू सुरु झाला आहे. थंडीत शरीराला पोषक तत्वे मिळवून देण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार फार महत्त्वाचा ठरतो. इतर ऋतुंपेक्षा थंडीच्या ऋतूमध्ये वजन कमी करणे अधिक सोपे ठरते. या ऋतूत तुम्ही भरपूर व्यायाम करून आणि स्वस्तात मिळणाऱ्या भाज्यांचे सेवन करून आपले वाढलेले वजन क्षणार्धात कमी करू शकता. आपल्याला कितीही भाज्या आवडत नसल्या तरी भाज्यांचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याचे असते, ज्यामुळे आहारात आवर्जून भाज्यांचे सेवन करावे.
भाज्यांमध्ये फार कमी कॅलरीज असतात, सोबतच यात खूप सारे पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास आणि पटकन वजन कमी करण्यास मदत करत असतात. यामुळे शरीराला उष्णताही मिळते. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा काही भाज्या सांगणार आहोत, ज्यांचे सेवन करून तुम्ही क्षणार्धात तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता.
गुच्छाने होणारी केसगळती क्षणार्धात थांबेल, 365 दिवस घरात असणाऱ्या या पावडरने स्वछ धुवा केस, जाणून घ्या योग्य पद्धत
पालक
पालक ही भाजी फार कमी कॅलरीजमध्ये अधिक पोषकद्रव्ये मिळवून देते, ज्यामुळे हीच आवर्जून आहारात समावेश करावा. थंडीत याचे सेवन फायद्याचे ठरू शकते. यात भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम आणि फायबर असते. हे पदार्थ आपल्या शरीराला ऊर्जा मिळवून देण्यास आणि आपले वजन कमी करण्यास मदत करतात. शशिवाय पालकमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक घटक दूर करतात.
कोबी
कोबी ही देखील एक अशी भाजी आहे फायबर, पोटॅशियम आणि कॅलरीज भरपूर प्रमाणात आढळल्या जातात. कोबीपासून भाजीच नव्हे तर इतरही अनेक पदार्थ बनवले जातात जसे की, कोबी मांचुरियन, कोबी पराठा, कोबी सूप इ. वजन कमी करण्यासही याची फार मदत होत असते. थंडीत उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी तुम्ही आपल्या आहारात कोबीचा समावेश करू शकता.
लाल भोपळा
लाल भोपळा हा अनेकांना खायला तितकासा आवडत नाही मात्र यातही अनेक पोषक घटक आढळले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरत असतात. लाल भोपळ्यात कॅलरीज फार कमी असतात शिवाय यात व्हिटॅमिन A, C, K आणि भरपूर पोटॅशियम, मॅग्नेशियम व लोह यांसारखे मिनरल्स आढळतात. हे शरीर मजबूत करण्यास आणि वाढलेली चरबी कमी करण्यास मदत करते.
Korean Glass Skin मिळवण्यासाठी 5 स्किन केअर टिप्स फॉलो करा, महागडे प्रोडक्टस खरेदी करण्याची गरज नाही
मुळा
थंडीच्या दिवसांत मुळ्याचे विशेष करून सेवन करावे. ही एक उष्णतादायक भाजी आहे. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. नियमित याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी किंवा घातक पदार्थ बाहेर फेकले जातात. तुम्ही मुळ्याची भाजी किंवा पराठे तयार करून याचा आपल्या आहारात समावेश करू शकता.
टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.