रोजच्या या 5 सवयींमुळे तुमची स्मरणशक्ती हळूहळू होत आहे कमकुवत, वेळीच व्हा सावध नाहीतर महागात पडेल
कोणतेही काम असो मग ते का अभ्यासासंबंधित असो वा कामासंबंधित कोणत्याही क्षेत्रात आपल्याला आपली स्मरणशक्ती फार कामी येत असते. याच्या जोरावर आपण अनेक गोष्टी लक्षात ठेवून वेळेत करू शकतो. तसेच याच्या जोरावर आपण जीवनातील शिखर गाठू शकतो, आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आपली स्मरणशक्ती चांगली असेल तर चार लोक आपल्याकडे आदराने पाहू लागतात.
तुमची स्मरणशक्ती उत्तम असेल तर ती तुमची ओळख देखील बनू शकते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आपल्या रोजच्या जीवनात आपण करत असलेल्या काही वाईट सवयी आपली स्मरणशक्ती कमकुवत करण्याचे काम करत असतात. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास तुमची स्मरणशक्ती बिगडू शकते आणि लहान-सहान गोष्टीही तुमच्या ध्यानात राहणार नाहीत. या नक्की कोणत्या सवयी आहेत ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
पुरुषांच्या या सवयींवर लगेच भाळतात महिला; आजच अवगत करा ‘हे’ गुण नाहीतर आयुष्यभर सिंगल रहाल
अपुरी झोप
आपल्या मेंदूसाठी झोप फार महत्त्वाची असते. झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूच्या पेशी नीट काम करू शकत नाहीत, त्यामुळे स्मरणशक्ती कमजोर होते. त्यामुळे रोज 7-8 तासांची झोप घेणे गरजेचे आहे.
अनहेल्दी डाएट
आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो. जंक फूड, तळलेले पदार्थ आणि साखरयुक्त पदार्थ मेंदूची कार्य करण्याची क्षमता कमी करतात. जीवनसत्त्वे, खनिजे आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिडने भरपूर आहार घेतल्यास स्मरणशक्ती मजबूत होते.
स्मार्टफोनचा अतिवापर
स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा अतिवापर मनाला आळशी बनवतो. प्रत्येक माहितीसाठी इंटरनेटवर अवलंबून राहिल्याने आपल्या स्मरणशक्तीचा वापर कमी होतो, ज्यामुळे ती हळूहळू कमकुवत होऊ लागते.
स्वयंपाकघरातील या 5 रुपयांच्या पदार्थाने आठवडाभरातच उगवतील नवे केस, यापासून घरीच बनवा तेल
पाण्याची कमतरता
आपल्या शरीराला पाण्याची नितांत आवश्यकता असते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. डिहाइड्रेशनमुळे, स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे दररोज भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे.
मल्टीटास्किंग
एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची सवय मनावर दडपण आणते. मल्टीटास्किंगमुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते आणि याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होऊ लागतो. त्यामुळे एकावेळी अनेक गोष्टी न करता कोणत्या तरी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरेल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून यात कोणत्याही प्रकारचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.