(फोटो सौजन्य: istock)
बदलत्या वातावरणामुळे आपल्या शरीरात अनेक बदल घडून येतात. यामुळे शरीराच्या समस्यांबरोबरच केसांच्या समस्याही जाणवू लागतात. सध्या हिवाळा ऋतू आहे. या ऋतूत केसांच्या समस्या दुपटीने वाढतात. यामुळे केसगळणे, कोंडा अशा समस्या जाणवू लागतात. केसगळतीची समस्या काही नवी नाही मात्र या थंडीच्या या वातावरणात केसगळती अधिक वाढते. केसांचे असे हे झपाट्याने गळणे आपल्याला चिंतेंत टाकते. प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. अशात केसांच्या या समस्या आपल्या सौंदर्यात बाधा आणतात.
केसांच्या समस्या फक्त महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही जाणवतात. अनेकजण केसगळती दूर करण्यासाठी महागडे प्रोडक्टस वापरतात मात्र त्यांचा वापर करूनही बऱ्याचदा हवे तसे परिणाम दिसून येत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, विकतच्या प्रोडक्टसमध्ये अनेक रासायनिक घटक वापरले जातात ज्यामुळे ते आपले केस डॅमेज करू शकतात. अशात तुम्ही नैसगिर्क उपायांची मदत घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला केसगळतीवर एक सोपा आणि रामबाण उपाय सांगणार आहोत याच्या मदतीने आठवडाभरातच तुमची केसगळती थांबेल आणि तुमच्या केसांची वाढीही होईल.
एक सिगारेट कमी करते 20 मिनिटांचे आयुष्य, अभ्यासात समोर आले भयानक सत्य; वेळीच व्हा सावध
शतकानुशतकांपासून केसांच्या आरोग्यासाठी मोहरीचे तेल वापरले जाते. हे तेल केसांना पोषण मिळवून देते ज्यामुळे त्यांची झपाट्याने वाढ होते. आजही अनेक डोंगराळ भागात केसांसाठी मोहरीचे तेल वापरले जाते. मोहरीच्या तेलात अँटीऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे केसांना मुळांपासून मजबूत करण्यास आणि केसगळती थांबण्यास मदत करते. याच्या नियमित वापराने कोंड्याची समस्याही दूर होते.
साहित्य
कृती
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.