(फोटो सौजन्य: istock)
आजकालच्या या धावपळीच्या व्यस्त जीवनात प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट ही झटपट करू पाहत. लोक कोणत्याही गोष्टीत आपला फारसा वेळ घालवत नाही आणि लगेच पुढे वाटचाल करतात. यात प्रेम ही गोष्ट देखील समाविष्ट आहे. बदलत्या काळानुसार प्रेमाच्या व्याख्या बदलल्या. आजकाल बहुतेकजण आपल्या जोडीदारात वेगवेगळे गुण पाहतात मात्र यात फार वेळ घालवत नाही अशात त्यांना इम्प्रेस करायचे असल्यास आपल्यात काही विशेष गुण असायला हवेत जे प्रथमदर्शी दिसतील आणि क्षणात समोरच्याला तुमच्या प्रेमात पडतील.
अनेकदा आपण पाहतो की, पुरुष स्त्रियांना ओळखण्यात कुठे तरी कमी पडतात ज्यामुळे नव्याने सुरु होत असलेले नाते मध्यातच संपुष्टात येते. प्रेमाबद्दल प्रत्येकाची वेगळी धारणा वेगळी असते. अशात स्त्रियांना कोणत्या गोष्टी आकर्षित करतात या गोष्टी आधीच माहिती असणे फायद्याचे ठरते. प्रत्येक वेळी स्त्रियांना पुरुषांचे सौंदर्यच आकर्षित करत नाही तर काही खास गुण देखील त्यांना पुरुषांकडे खेचत आणतात. हे प्रभावी गुण तुमच्यात असल्यास तुम्ही स्त्रियांच्या मनात तुमची वेगळी जागा निर्माण करू शकता आणि त्यांना क्षणात इम्प्रेसही करू शकता. जर तुम्हाला आपल्या नातेसंबंधात अधिक स्थिरता आणि परिपक्वता आणायची असेल, तर हे गुण आत्मसात करणे निश्चितच तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. हे कोणते गुण आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
स्वयंपाकघरातील या 5 रुपयांच्या पदार्थाने आठवडाभरातच उगवतील नवे केस, यापासून घरीच बनवा तेल
जबाबदार आणि समजूतदारपणा
समजूतदारपणे आपली जबाबदारी स्वीकारून आपल्या कुटुंबासाठी तसेच जोडीदारासाठी स्थैर्य निर्माण करणारे पुरुष महिलांना अधिक आवडतात. बहुतेक महिला या आपल्या जीवनात कोणतेही निर्णय घेताना एक सल्लागार म्हणून आपल्या जोडीदारकडे पाहतात. अशात जोडीदाराला साथ देणारा आणि प्रत्येक परिस्थितीत योग्य तो निर्णय घेणाऱ्या पुरुषांकडे त्या लगेच आकर्षित होतात. फक्त शब्दातच नव्हे तर आपल्या कृतीतूनही प्रेम दर्शवणारे पुरुष महिलांना अधिक पसंत पडतात.
काळजी आणि आपुलकी दर्शवणारे
नात्यात फक्त प्रेमच महत्त्वाचे नाही तर वेळ पडल्यास आपुलकी दाखवणे आणि आपल्या जोडीदाराची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. महिलांना असे पुरुष आवडतात जे त्यांना समजून घेऊन अडचणीच्या क्षणी त्याच्यासोबत राहतात आणि त्यांना समजून घेतात. छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे, जोडीदाराला वेळ देणे आणि संकटाच्या वेळी त्यांना आधार देणे या काही निवडक गोष्टींची त्यांना अपेक्षा असते. अनेकदा त्यांना आपल्या जोडीदाराकडून त्याने आपला आधार बनून फक्त आपल्या सोबत राहण्याची इच्छा असते.
एक सिगारेट कमी करते 20 मिनिटांचे आयुष्य, अभ्यासात समोर आले भयानक सत्य; वेळीच व्हा सावध
विनोदी स्वभाव
अनेकदा ज्या गोष्टी संभाषणातून बोलता येत नाही त्या विनोद माध्यमातून चांगल्या व्यक्त करता येतात. महिलांना असे पुरुष फार आवडतात जे कठीण काळातही त्यांना हसवण्याचा प्रयत्न करतात आणि सकारात्मकतेचा दृष्टिकोन ठेवतात. कोणत्याही नात्यात जर आनंद असेल तर आपोआप ते नाते काळासोबत आणखीन घट्ट बनत जाते आणि दीर्घकाळ टिकते. महिलांना असे पुरुष आवडतात जे लहान लहान गोष्टींमध्येही आनंद शोधतात आणि मोकळेपणाने आपले जीवन जगतात.
प्रामाणिकपणा
कोणतेही नाते हे विश्वासावर पुढे वाटचाल करत असते. अशात जोडीदाराबाबत आपल्या मनात विश्वास असणे फार गरजेचे असते. महिलांना असे पुरुष आवडतात जे त्यांच्याशी खोटं बोलत नाही, कोणतीही गोष्ट त्यांच्यापासून लपवत नाहीत आणि जे मोकळेपणाने आपल्यासमोर व्यक्त होतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात. नात्यात पारदर्शकता असेल तर यामुळे गैरसमज होत नाहीत आणि नाते दीर्घकाळ विश्वासाच्या जोरावर टिकून राहते. अशात महिलांचा विश्वास जिंकल्यास आपोआपच त्यांच्या हृदयाचे दारही तुमच्यासाठी खुले होतील.