Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIRमध्ये १२ जिवंत लोकांना मृत घोषित, ६५ लाख लोकांची नावे नाही; कपिल सिब्बलांनी वेधले सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष

बिहारमधील एसआयआरच्या दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या यांच्या खंडपीठाने मंगळवारी (१२ ऑगस्ट २०२५) या प्रकरणाची पुन्हा सुनावणी केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 12, 2025 | 03:17 PM
Accept 11 documents including Aadhaar card for SIR...; Supreme Court orders the Commission

Accept 11 documents including Aadhaar card for SIR...; Supreme Court orders the Commission

Follow Us
Close
Follow Us:

बिहार निवडणुकीपूर्वी SIR
SIRमध्ये ६५ लाख लोकांची नावेच वगळली
कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तीवाद

लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपावरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये सुरू असलेले विशेष सघन पुर्नपरिक्षण (SIR) चा मुद्दाही चांगलाच पेटला आहे. एसआयआरच्या माध्यमातून बिहारमधील मतदार यादीत फेरफार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातआहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

India Rain News: पुढचा आठवडा ‘या’ दोन राज्यांसाठी कसोटीचा; वरूणराजा असा कोसळणार की…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता

बिहारमधील एसआयआरच्या दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या यांच्या खंडपीठाने मंगळवारी (१२ ऑगस्ट २०२५) या प्रकरणाची पुन्हा सुनावणी केली. यावेळी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एसआयआरमधील काही त्रुटी सर्वोच्च न्यायालयात मांडल्या आहेत. यानुसार, एसआयआरच्या पहिल्या मसुदा यादीत १२ जिवंत लोकांना मृत दाखवण्यात आले आहे. त्याचवेळी ६५ लाख लोकांचा समावेश करण्यात आलेला नाही, याकडे कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधले आहे. कपिल सिब्बल यांच्या या युक्तीवादावर निवडणूक आयोगाचे वकील म्हणाले की, ” एवढ्या मोठ्या प्रक्रियेत छोट्या चुका शक्य आहेत, पण अंतिम यादी दुरूस्त केली जाईल, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाने, ‘पिडीत कुठे आहेत, त्याची यादी कुठे आहे. जर एखाद्या जिवंत व्यक्तीला मृत घोषित केले गेले असेल आणि तो जिवंत असेल तर आम्ही निवडणूक आयोगाला त्याबद्दल जाब विचारू शकतो,’ असे सांगितले. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी, ‘प्रत्येक मतदान केंद्रावर फेरफार होत आहे, असे असताना आम्हा पिडीतांना कसे शोधणार, असे उत्तर दिले. त्यावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, पण तुम्ही तर एसआयआरच्या सुरूवातीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. त्यावर सिब्बल यांनी, मी फक्त एवढे म्हणत आहे की ,ते असं करू शकत नाही.

डेव्हिड वॉर्नरने मोडला विराट कोहलीचा मोठा विक्रम, T20 क्रिकेटमध्ये केला पराक्रम

यादरम्यान, वकील गोपाल शंकरनारायण यांनी न्यायालयाच्या टिप्पणीचा संदर्भ देत सांगितले की, तुम्ही म्हटले होते की जर मोठ्या संख्येने लोक यादीतून काढून टाकले जात असतील तर तुम्ही हस्तक्षेप कराल. पण मसुदा यादीतच ६५ लाख लोकांची नावेच वगळण्यात आली आहेत. यावर न्यायाधीश म्हणाले की, परिस्थिती काय आहे, हे चर्चेदरम्यान कळू शकेल, असं न्यायाधिशांनी स्पष्ट केलं.

त्यावर कपिल सिब्बल म्हणाले की, एखाद्या व्यक्तीसाठी त्या परिसरातील नागरिक आणि रहिवासी असणे पुरेसे आहे, त्यासाठ आधार कार्डमध्ये नोंदवलेली माहिती नियमांनुसार वैध आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाचे वकील राकेश द्विवेदी म्हणाले की, आणखी काही नवीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यांचे उत्तर देता आले नाही. त्यांनी सांगितले की सोमवारी काही आयएंना कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. ती २०० पानांची आहेत आणि त्यांना उत्तर देता आले नाही. आयोगाच्या युक्तीवादावर न्यायालयाने, की काही फरक पडत नाही. गरज पडल्यास त्यासाठी वेळ दिला जाईल, असे स्पष्ट केलं

Web Title: 12 living people declared dead in sir names of 65 lakh people missing kapil sibal draws attention of supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Bihar Assembly Election Result
  • kapil sibal
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Delhi Air Quality: दिल्लीकर श्वासातून घेतायेत विष; ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली चिंता
1

Delhi Air Quality: दिल्लीकर श्वासातून घेतायेत विष; ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली चिंता

Sahara Refund Process: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ‘सहारा’ मध्ये अडकलेले पैसे परत कसे मिळवावे?
2

Sahara Refund Process: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ‘सहारा’ मध्ये अडकलेले पैसे परत कसे मिळवावे?

Akola Nagar Parishad Elections: मतदार यादीत मोठा घोळ! जवळपास दोन हजार मतदारांची दुहेरी नोंद; २ डिसेंबरच्या मतदानावर प्रश्नचिन्ह
3

Akola Nagar Parishad Elections: मतदार यादीत मोठा घोळ! जवळपास दोन हजार मतदारांची दुहेरी नोंद; २ डिसेंबरच्या मतदानावर प्रश्नचिन्ह

स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
4

स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.