Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खून हा गंभीर नव्हे; अमानुष गुन्हा… बालन्याय कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा बदल

बालन्याय कायद्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत खुनाच्या गुन्ह्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. या निकालामुळे अल्पवयीन आरोपींशी संबंधित प्रकरणांच्या सुनावणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2026 | 10:28 AM
खून हा गंभीर नव्हे; अमानुष गुन्हा... बालन्याय कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा बदल

खून हा गंभीर नव्हे; अमानुष गुन्हा... बालन्याय कायद्याबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा बदल

Follow Us
Follow Us:
  • सर्वोच्च न्यायालयाने IPC कलम 302 अंतर्गत खुनाच्या गुन्ह्याबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टोक्ती केली.
  • बालन्याय मंडळाच्या प्राथमिक तपासासाठी न्यायालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.
  • या निर्णयामुळे गंभीर गुन्ह्यांतील अल्पवयीन आरोपींच्या खटल्यांवर दूरगामी परिणाम होऊ शकतो.
भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०२ गुन्हा हा बालन्याय कायदा, २०१५ अंतर्गत अमानुष गुन्हा मानला जाईल, असे महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बाल न्याय कायद्याच्या तरतुदींमध्ये किमान शिक्षेचा स्पष्ट उल्लेख नसला, तरी जन्मठेपेची शिक्षा हीच त्याची अप्रत्यक्ष किमान शिक्षा मानली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायाधीश जेबी पारडीवाला आणि न्यायाधीश उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने बिहारमधील एका हत्येच्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची याचिका फेटाळताना हा निर्णय दिला. बिहार १६ वर्षे ४ महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलाने में २०२२ मध्ये एकाचा चाकूने गळा चिरून खून केला होता. सुरुवातीला बालन्याय मंडळाने (जेजेबी) आरोपीमध्ये गुन्हा करण्याची शारीरिक व मानसिक क्षमता नव्हती, असे सांगत प्रकरण स्वतःकडे ठेवले होते. मात्र, सत्र न्यायालयाने आणि त्यानंतर पाटणा उच्च न्यायालयाने आरोपीवर प्रौढ गुन्हेगाराप्रमाणेच खटला चालवण्याचे आदेश दिले होते.

Kalyan Crime: बेपत्ता शिक्षिकेचा मृतदेह घोटीत सापडला; प्रॉपर्टीच्या हव्यासातून हत्या; अनेक वर्षांचा मित्रच निघाला मास्टरमाइंड

बाल न्याय मंडळासाठी (जेजेबी) नवीन मार्गदर्शक तत्वे

  • सर्वोच्च न्यायालयाने बालन्याय मंडळाला कलम १५ अंतर्गत प्राथमिक तपास करताना खालील बाबींची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
  • प्राथमिक तपास हा खटला (ट्रायल) नाही.
  • मुलाची मानसिक आणि शारीरिक क्षमता तसेच गुन्ह्याचे गांभीर्य तपासताना अहवालावर आंधळा विश्वास ठेवू नये.
  • जबाब आणि तज्ज्ञांचा अहवाल या सर्व गोष्टींचा निष्पक्षपणे विचार केला पाहिजे.
जन्मठेप हीच या गुन्ह्याची किमान शिक्षा

आरोपीच्या वकिलांनी शिल्या मित्तल प्रकरणाचा दाखला देत असा युक्तिवाद केल होता की, आयपीसी ३०२ मध्ये किमान शिक्षेचा थेट शब्दश: उल्लेख नाही, त्यामुळे हत्येचा गुन्हा अमानुष गुन्हा न मानता केवळ गंभीर गुन्हा मानला जावा, सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावताना जेबी पारडीवाला आणि न्यायाधीश उज्ज्वल भुयान, यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, आयपीसी ३०२ अंतर्गत, दोषी ठरलेल्या व्यक्तीला न्यायालय जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षा देऊच शकत नाही. कायद्यात जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षेचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे जन्मठेप हीच या गुन्ह्याची किमान शिक्षा आहे आणि म्हणूनच हत्येचा गुन्हा हा बालन्याय कायद्यांतर्गत ‘अमानुष गुन्ह्यांच्या’ श्रेणीतच येतो.

Ambarnath Crime: थरकाप उडवणारी घटना! वरवंट्याने डोक्यावर वार, गुप्तांगावर…; 7 वर्षीय मुलाची आईच्या प्रियकराकडून हत्या

मानसोपचार तज्ज्ञांची मदत अनिवार्य आहे का?

अपीलीय न्यायालयाला बालन्याय कायद्याच्या कलम १०१(२) अंतर्गत मानसोपचारतज्ज्ञ किंवा वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेण्याचा अधिकार आहे; मात्र अशी मदत घेणे अनिवार्य नसून ते न्यायालयाच्या स्वेच्छाधिकारावर अवलंबून असेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Supreme court rules murder is heinous offence under juvenile justice act ipc 302

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Court
  • crime news
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court On CJP Protest: ‘तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात’; संसद मोर्चावरील लाठीमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे खडे बोल
1

Supreme Court On CJP Protest: ‘तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात’; संसद मोर्चावरील लाठीमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे खडे बोल

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा
2

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
3

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
4

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.