गुजरातमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मोरबी (Morbi) येथे निर्माणाधीन मेडिकल कॅालेजच्या इमारतीचा स्लॅब (Medical College Slab Collapsed) कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत तर आणखीही काही जण इमारतीमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. दुर्घटनेतील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
[read_also content=”मणिपूरमध्ये आणखी एका लष्करी अधिकाऱ्याचं अपहरण, सुट्टीवर घरी आलेला असचान अज्ञातांनी घरुन उचलून नेलं! https://www.navarashtra.com/india/army-officer-kidnapped-in-manipur-from-home-amid-manipur-violence-nrps-513807.html”]
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मोरबी येथे एक मेडीकल कॅालेजचं बांधकाम सुरु आहे. शुक्रवार संध्याकाळच्या सुमारास या मेडिकल कॉलेजचा स्लॅब अचानक कोसळला. या घटनेबद्दल कळताच स्थानिकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. या दुघटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दुर्घटनेत स्लॅब कोसळल्याने चार जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेसंबंधित दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.






