सांगली जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाने १४ ऑक्टोबर रोजी याबाबत निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांसाठी १२ सवलती आणि उपाययोजना जाहीर केल्या आहेत. राज्यातील खरीप हंगाम २०२६ मधील पावसाची तूट आणि इतर निकषांच्या आधारे एकूण ३०५ तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, शिराळा, वाळवा, खानापूर, तासगाव, कडेगाव आणि पलूस या तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सवलत आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. याशिवाय टँकरने पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा, रोजगार हमीची कामे आणि जलसंधारणावर भर दिला जाणार आहे.