नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशाच्या सियांग जिल्ह्यात शुक्रवारी लष्करी हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात सर्वच ५ जवान शहीद झालेत. हा अपघात टूटिंग मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर असणाऱ्या सिंगिंग गावालगत झाला होता. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अपघातापूर्वी वैमानिकाने ATCला Mayday Call केला होता.
अपघातग्रस्त ‘रुद्र’ लष्कराचे प्रगत लढाऊ हेलिकॉप्टर आहे. ते हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) तयार केले आहे. रुद्र हलक्या ध्रुव हेलिकॉप्टरचे वेपन सिस्टम इंटीग्रेटेड ((डब्ल्यूएसआय) एमके-४ सुधारित आवृत्ती आहे.
गत ५ तारखेला अरुणाचल प्रदेशातीलच तवांगमध्ये लष्कराचे चीता हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. हा अपघात सकाळी १० च्या सुमारास झाला होता. त्यात २ वैमानिक होते. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.