पंजाबमधून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. तरनतारनमध्ये येथे अर्धनग्न महिलेची रस्त्यावर धिंड काढण्यात आल्याची घटना घडली आहे. आपल्या मुलीचा प्रेमविवाह करुन दिल्याबद्दल मुलीच्या कुटुंबियांनी मुलाच्या आईसोबत लज्जास्पद कृत्य केलं. तिच्यासोबत गैरवर्तन करत अर्धनग्न करत तिची भररस्त्यात धिंड काढली. या घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली असून सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
[read_also content=”आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार ‘मायलेक’, जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला! https://www.navarashtra.com/movies/sonali-khare-shanaya-aanand-starrer-maykek-movie-trailer-lunched-nrps-521027.html”]
पंजाबमध्ये मुलानं प्रेमविवाह केल्याने मुलाच्या आईला शिक्षा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या मुलाने एका मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. यामुळे मुलीच्या घरच्यांना खूप राग आला. मुलगा आणि मुलगी दोघेही घरातून पळून गेले होते. अशा परिस्थितीत मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या आईला मारहाण केली आणि तिच्यासोबत गैरवर्तनही केले. तिला अर्धनग्न करत तिला रस्त्यावर फिरायला लावलं.
याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आरोपी शरणजीत सिंग उर्फ सनी, गुरचरण सिंग, कुलविंदर कौर उर्फ मणी आणि दोन अनोळखी व्यक्तींचा सहभाग आहे. पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजही गोळा केले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल.
ही सगळी घटना घडत असताना ती महिला मदत मागत राहिली पण कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. लोक या घटनेचा व्हिडिओ बनवत राहिले पण कोणीही मदत केली नाही.
अर्धनग्न महिलेची रस्त्यावर धिंड काढल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर महिला आयोगही दखल घेतली आहे. आयोगाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाचा तपास अहवाल मागवला आहे.






