Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर भारतात थंडीची लाटच; डोंगराळ भागांत बर्फवृष्टी, जनजीवनावर मोठा परिणाम

पश्चिम हिमालयीन शिखरांवर बर्फवृष्टी, मैदानी भागात दाट धुके, थंडीचे दिवस आणि काही भागात थंडीची लाट यांचा जनजीवनावर गंभीर परिणाम होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 27, 2025 | 07:16 AM
उत्तर भारतात थंडीची लाटच; डोंगराळ भागांत बर्फवृष्टी, जनजीवनावर मोठा परिणाम

उत्तर भारतात थंडीची लाटच; डोंगराळ भागांत बर्फवृष्टी, जनजीवनावर मोठा परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमानात घट होऊन थंडी वाढताना दिसत आहे. नवीन वर्षाच्या आधी, उत्तर भारत, पूर्व आणि ईशान्य भारतात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. या बदलत्या हवामानाचा वाहतूक आणि आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहे. या बदलत्या हवामानापासून सध्यातरी कोणताही दिलासा मिळणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.

देशातील अनेक भागांत दाट धुके कायम राहण्याची अपेक्षा आहे आणि नवीन वर्षापर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळेत बहुतेक भागात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे. पश्चिम हिमालयीन शिखरांवर बर्फवृष्टी, मैदानी भागात दाट धुके, थंडीचे दिवस आणि काही भागात थंडीची लाट यांचा जनजीवनावर गंभीर परिणाम होत आहे. या हवामानाचा वाहतूक आणि आरोग्यावरही परिणाम होत आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) नुसार, १ जानेवारीपर्यंत उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये रात्री आणि सकाळच्या वेळेत खूप दाट धुके राहण्याचा अंदाज आहे.

हेदेखील वाचा : यंदा सगळं काही जास्तच! पुणेकर थंडीने गारठले; डिसेंबरने 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, २३ दिवसांतच…

तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ३० डिसेंबरपर्यंत, बिहारमध्ये २७ डिसेंबरपर्यंत आणि आसाम आणि मेघालयात २६ डिसेंबरपर्यंत धुके राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याव्यतिरिक्त, आसाम, मेघालय, बिहार आणि ओडिशाच्या काही भागात ३० डिसेंबरपर्यंत, अरुणाचल प्रदेशात २८ डिसेंबरपर्यंत आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये २७ डिसेंबरपर्यंत दाट धुके राहण्याची शक्यता आहे.

पिंपरीत शाळांच्या वेळांत बदल

वाढती थंडी आणि हिवाळ्यात लवकर पडणारा अंधार लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या निर्णयानुसार आता सर्व महापालिका शाळा सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भरविण्यात येणार आहेत.

पुण्यात यंदा हुडहुडी वाढली

पुण्यात यंदा हुडहुडी वाढली असून डिसेंबर महिन्याने थंडीचे गेल्या १० वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. डिसेंबरच्या अवघ्या २३ दिवसांतच तब्बल १३ दिवस किमान तापमानाची नोंद ‘एक’ अंकी झाली आहे. गेल्या १० वर्षांतील हा एक विक्रम ठरला आहे. २०१४ पासूनची आकडेवारी पाहता यंदाचा डिसेंबर सर्वाधिक थंड असल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : यंदा सगळं काही जास्तच! पुणेकर थंडीने गारठले; डिसेंबरने 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, २३ दिवसांतच…

Web Title: A cold wave is sweeping across north india snowfall in the hilly regions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 07:11 AM

Topics:  

  • Climate Change
  • Weather Update
  • Winter Season

संबंधित बातम्या

यंदा सगळं काही जास्तच! पुणेकर थंडीने गारठले; डिसेंबरने 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, २३ दिवसांतच…
1

यंदा सगळं काही जास्तच! पुणेकर थंडीने गारठले; डिसेंबरने 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, २३ दिवसांतच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.