यंदाचा डिसेंबर ठरला सर्वाधिक थंड (फोटो- istockphoto)
यंदाचा डिसेंबर ठरला सर्वाधिक थंड
१० वर्षातील सर्वाधिक एक अंकी किमान तापमानाची नोंद
यंदाचा डिसेंबर सर्वाधिक थंड असल्याचे निरिक्षण
पुणे: पुण्यात यंदा हुडहुडी वाढली असून डिसेंबर महिन्याने थंडीचे गेल्या १० वर्षांतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. डिसेंबरच्या अवघ्या २३ दिवसांतच तब्बल १३ दिवस किमान तापमानाची नोंद ‘एक’ अंकी झाली आहे. गेल्या १० वर्षांतील हा एक विक्रम ठरला आहे. २०१४ पासूनची आकडेवारी पाहता यंदाचा डिसेंबर सर्वाधिक थंड असल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे.
पुणे आणि परिसरामध्ये बुधवारी (ता. २४) किमान तापमान स्थिर राहणार असून ९ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. तर गुरुवारपासून (ता. २५) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान ११ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra Weather : हुडहुडी कमी होणार! ख्रिसमसनंतरच मिळणार थंडीपासून दिलासा, काय आहे IMD चा अंदाज?






