Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटी शिवाचा झाला तौकीर; वय, धर्म, समाजाला झुगारून प्रेमं जिकंलच, बिहार- महाराष्ट्राची ही Love story वाचाच…

महाराष्ट्रातील एक महिला सीतामढी येथील एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. मात्र, त्यांच्यामध्ये वयाच अंतर असल्याने तरुणानं हे नातं पुढं नेण्यास नकार दिला होता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 28, 2023 | 11:59 AM
शेवटी शिवाचा झाला तौकीर; वय, धर्म, समाजाला झुगारून प्रेमं जिकंलच, बिहार- महाराष्ट्राची ही Love story वाचाच…
Follow Us
Close
Follow Us:

सीतामढी : प्रेम (Love Is Blind) आंधळं असतं.  असं ज्याने कुणी म्हटलं ते बरोबरच म्हण्टलंय. जो प्रेमाच्या सागरात बुडतो तो किती खोलवर गेला हे कळत नाही. त्याला फक्त प्रेमाच्या सागरात खोलवर बुडून जायचे असते. प्रेम काय असते, त्याची उत्कटता कशी असते हे जाणून घ्यायचे असेल आणि समजून घ्यायचे असेल, तर बिहार (Bihar) आणि महाराष्ट्राची (Maharashtra) ही लव्हस्टोरी (Love story) वाचाचं.

[read_also content=”लग्नानंतर संबंध ठेवण्यास वधूची टाळटाळ, संतापलेल्या वराने केलं असं काही…मात्र, सत्य समोर येताच बसला जबर धक्का https://www.navarashtra.com/crime/the-bride-did-not-make-relations-for-many-days-after-the-marriage-groom-forcibly-touched-her-then-the-truth-shocked-the-groom-nrps-424143.html”]

नेमकं प्रकरण काय?

आपलं प्रेम मिळवण्यासाठी महाराष्ट्रातून थेट बिहारच्या भूमीत पोहोचलेल्या शिवाची ही कहाणी आहे. तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या तरुणाचे प्रेम मिळवण्यासाठी शिवाने सर्व काही सोडले आणि सीतामढी गाठले. आणि तिला तिचं प्रेम मिळेपर्यंत ती तिथेचं राहिली.  अखेर तिला तिचं प्रेम मिळालं.

या लव्हस्टोरीतील महिलेचे वय सुमारे 50 वर्षे, तर तरुणाचं वय अवघं 25 वर्ष आहे. शिवा असं महिलेचं नाव आहे. ती पुणे येथील  रहिवासी आहे. तर, तौकीर हा बिहारच्या बेडोल गावात राहतो. सुरुवातीला दोघांमध्ये सुरू झालेलं आकर्षण प्रेमापर्यंत पोहोचलं.मात्र, वास्तविकता लक्षात आल्यावर तौकीर वयाच्या अंतराच कारण देत तिच्यापासून दूर जाऊ लागला. मात्र हा धक्का सहन न झाल्यानं  प्रेमात वेड लागलेल्या शिवाने प्रियकराला मिळवण्यासाठी पती आणि मुलांना सोडून थेट सीतामढी येथील पुपरी जाण्याचा निर्णय घेतला. आठवडाभर चाललेल्या या हायव्होल्टेज ड्रामानंतर सोमवारी या प्रकरणावर पडदा पडला.

पोलिसांच्या डोक्याला ताप

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू होती. शिवा ही महिला त्याच्या आईच्या वयाची असल्याचे तौकीर वारंवार पोलिसांना सांगत होता आणि आपल्याला हे नातं नको असल्याचंही सांगत होता. महिलेने त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं असल्याचंही तो म्हणत होता. मात्र, हे ऐकल्यानंतर शिवाने पोलीस स्टेशनमध्ये चांगलाच राडा केला. प्रेमाला वयाची मर्यादा नसते.  तिने तौकीरला पती म्हणून स्वीकारले आहे. वर्षभरापासून ते पती-पत्नी म्हणून राहत होते. तिला कशाचीही गरज नाही, फक्त तौकीर हवा आहे असं ती पोलिसांना सांगत होती. या संपूर्ण प्रकरणात मात्र पोलिसांच्या डोक्याला चांगलाच ताप झाला.

मी तौकीरला चांगला व्यक्ती बनवलं – शिवा

शिवा ही पुण्यातील एका खासगी नर्सिंग होममध्ये परिचारिका म्हणून काम करत असल्याचं तिने सांगितलं. तर तौकीरला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याची तिने पोलिसांना माहिती दिली. तिने त्याला एक चांगला माणूस बनवल्याचंही तिने सांगितलं. दुसरीकडे, तौकीरच्या कुटुंबाने शिवाला स्विकारण्यास नकार दिला होता. मात्र, शिवाने तौकीरला मिळवण्याची शपथ घेतली होती. त्यामुळे तिने हार मानली नाही आणि तौकीरला समजवण्याचे तिचे प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलं. तौकीर आणि त्याच्या कुटुंबाने शिवाला स्विकारलं असून पोलिसांना दिलेली तक्रारही मागे घेतली आहे. पोलिसांनी बाँड भरल्यानंतर तौकीरची सुटकाही केली. तौकीर शिवाला सोबत घेऊन घरी गेला.

Web Title: A women from pune reached to bihar to get her lover back nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2023 | 10:21 AM

Topics:  

  • bihar
  • Lovestory
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.