Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Election 2025 : ‘गृहमंत्री अमित शाहांनी दिल्लीला गुन्हेगारीची राजधानी बनवले’; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर हल्लाबोल

राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये आप नेते अरविंद केजरीवाल आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 10, 2025 | 04:25 PM
AAP leader Arvind Kejriwal criticizes Amit Shah for making Delhi a crime capital

AAP leader Arvind Kejriwal criticizes Amit Shah for making Delhi a crime capital

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निव़डणूकीसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दिल्लीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून आप, भाजप व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार आहे. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हा दिल्लीमध्ये हॅटट्रीक मारणार का? य़ाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर जोरदार निशाणा साधला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी आप जोरदार प्रचार करत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीपासून आपने प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी मार्लेना या जोरदार प्रचार करत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप पक्षावर अनेक घणाघाती प्रहार केले. यानंतर आता अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री व भाजप पक्षश्रेष्ठी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीला गुन्ह्यांची राजधानी बनवली असल्याची टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल म्हणाले की, “भाजप आता धरणे पक्ष बनला आहे. मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे की भाजप रोहिंग्यांच्या नावाखाली पूर्वांचलमधील लोकांची मते कापत आहे. भाजप दिल्लीतील लोकांचा द्वेष करते. म्हणूनच गेल्या 25 वर्षांपासून ते दिल्लीत पुन्हा सत्तेत येऊ शकलेले नाहीत. भाजपने दिल्लीला गुन्हेगारीची राजधानी बनवले आहे. चोरी, चेन स्नॅचिंग आणि टोळीयुद्धाच्या घटनांमध्ये वाढ झाली. आता महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.” अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

पुढे केजरीवाल म्हणाले की, “त्यांना लढणे, निषेध करणे आणि निरुपयोगी मुद्दे निर्माण करणे याशिवाय काहीही करायचे नाही. त्यांनी दिल्लीच्या लोकांसाठी कधीही काहीही केले नाही, म्हणूनच मतदार त्यांना निवडणुकीत मतदान करत नाहीत. दिल्लीमध्ये गुन्हेगारी इतकी वाढली आहे की लोक भीतीच्या छायेत जगत आहेत.  जर दिल्लीत कोणाला त्रास होत असेल तर माझ्या हृदयात मला वेदना होतात. गुन्हेगारी वाढत आहे, पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काहीही करत नाहीत,” असा घणाघात अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्ली निवडणूक संबंधी अपडेट एका क्लिकवर

त्याचबरोबर त्यांनी भाजपबाबत काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. केजरीवाल म्हणाले की, “गेल्या १० वर्षात भाजपने दिल्लीतील अनधिकृत वसाहतींसाठी काय केले आहे? त्यांनी एकही रस्ता किंवा एकच लेन बांधली आहे का? इतकी सत्ता आणि पैसा असूनही त्याने काय केले? आप सरकारने या वसाहतींमध्ये गटार जोडणी, वीज जोडणी, पाण्याच्या पाईपलाईन, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. शाळा, गल्ली दवाखाने, रुग्णालये उघडली. मी त्यांना एक सन्माननीय जीवन दिले. भाजपने घाणेरडे राजकारण करण्याशिवाय दुसरे काय केले आहे?” असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

 

 

Web Title: Aap leader arvind kejriwal criticizes amit shah for making delhi a crime capital delhi election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • Amit Shah
  • arvind kejariwal
  • Delhi Election 2025

संबंधित बातम्या

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले
1

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान
2

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?
3

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?

अमित शहा यांचा नवरात्रीदरम्यान बंगाल दौरा! दैवीशक्तीच्या साक्षीने राजकीय शक्तीप्रदर्शन
4

अमित शहा यांचा नवरात्रीदरम्यान बंगाल दौरा! दैवीशक्तीच्या साक्षीने राजकीय शक्तीप्रदर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.