Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest Breaking: सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; जंतर मंतरवर नेमकं काय घडलं?

अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी रात्री 'एक्स'वर पोस्टमध्ये  लिहीले आहे की, जंतर-मंतर येथे काही व्यक्तींनी सोनम वांगचुक यांच्यावर एक वस्तू फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

  • By anuradha sagar
Updated On: Jul 18, 2026 | 08:40 AM
CJP Protest Breaking: सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; जंतर मंतरवर नेमकं काय घडलं?
Follow Us
Follow Us:

CJP Protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.  ‘कोकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी ट्विटर ‘एक्स वर पोस्ट करत हा आरोप केला आहे. मात्र, या घटनेबाबत अद्याप दिल्ली पोलिसांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

सोशल मीडियावर काय दावा करण्यात आला?

अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी रात्री ‘एक्स’वर पोस्टमध्ये  लिहीले आहे की, जंतर-मंतर येथे काही व्यक्तींनी सोनम वांगचुक यांच्यावर एक वस्तू फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Cockroach Janta Party Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोनल सिरीयस नाही? टिकाकारांना अभिजीत दिपकेंचं सडेतोड उत्तर

रुग्णालयात हलवल्याचा दावा

या घटनेनंतर सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्याचे बोलले जात आहे. सोनम वांगचुक यांना दिल्लीतील सफदरगंड रुग्णालयात दाखल करण्यात आले असू यांची प्रकृती स्थिर आहे.   पण दुसरीकडे अभिजीत दिपके यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे.  तसेच, जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या आंदोलक आणि समर्थकांना पोलिसांनी तेथून हटवण्यास सुरुवात केल्याचेही सांगण्यात येत आहे.

जंतर-मंतर येथे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याच्या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी अधिकृत निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Sonam Wangchuk Health Update: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

‘प्रकृती खालावत असल्याने रुग्णालयात दाखल’

दिल्ली पोलिसांच्या निवेदनानुसार, सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत होती. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना आवश्यक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला’

पोलिसांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना काही आंदोलकांनी कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी किरकोळ झटापट झाली. मात्र, पोलिसांनी संयम राखत संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरक्षितपणे पूर्ण केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पोलिसांकडून जंतर-मंतर परिसरातून बाहेर नेत असताना सोनम वांगचुक हातवारे करताना दिसतात. दरम्यान, त्यांच्या समर्थकांनी या कारवाईचा निषेध केला. मात्र, पोलिसांनी त्यांना शांततेत रुग्णालयात नेल्याचे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या निवेदनाच्या शेवटी जंतर-मंतर येथे उपस्थित सर्व आंदोलकांना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शांततेने आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आवाहन केले आहे.

 

Web Title: Abhijit dipke claims attempted attack on activist sonam wangchuk in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Sonam Wangchuk
  • Student Protest

संबंधित बातम्या

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा
1

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा
2

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा
3

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा

Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
4

Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.