Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अदानी समूह चक्रव्यूहात; जेपीसी, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशीची मागणी; ९ पक्षांनी संसदेत दिली नोटीस

हिंडेनबर्गच्या रिसर्च रिपोर्टनंतर गौतम अदानी (Gautam Adani) समूहासमोरील आव्हाने दिवसेंदिवसे वाढत आहेत. अदानी ग्रुपने (Adani Group) एफपीओ रद्द केल्याच्या निर्णयावरून विरोधकांनी संसदेत रान उठवले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 03, 2023 | 07:57 AM
अदानी समूह चक्रव्यूहात; जेपीसी, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशीची मागणी; ९ पक्षांनी संसदेत दिली नोटीस
Follow Us
Follow Us:

दिल्ली : हिंडेनबर्गच्या रिसर्च रिपोर्टनंतर गौतम अदानी (Gautam Adani) समूहासमोरील आव्हाने दिवसेंदिवसे वाढत आहेत. अदानी ग्रुपने (Adani Group) एफपीओ रद्द केल्याच्या निर्णयावरून विरोधकांनी संसदेत रान उठवले आहे. विरोधकांनी गौतम अदानी यांच्याविरुद्ध होत असलेल्या फसवणुकीच्या आरोपांची चौकशी संसदीय समिती (जेपीसी) किंवा सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त समितीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान, काँग्रेससह अन्य १३ विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्यावर चर्चेची मागणी करीत संसदेच्या दोन्ही सभागृहात अक्षरशः गोंधळ घातल्याने संसदेचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आले. अदानी समूहाने बुधवार अचानक अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ रद्द करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये गौतम अदानी स्वतः आपल्या एफपीओमध्ये मोठी गुंतवणूक करणार होते असेही म्हटले होते.

९ पक्षांनी संसदेत दिली नोटीस

अदानी समूहाच्या परिस्थितीबाबत संसदेत चर्चेसाठी ९ पक्षांनी नोटीस दिली होती. लोकसभेचे कामकाज सुरू होताच, विरोधक आक्रमक झाले. त्यांनी ‘अदानी’ समूहाच्या मुद्यावर चर्चा घ्यावी, अशी मागणी लावून धरली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मागणी फेटाळून लावली.

आरबीआयने बँकांना मागितली कर्जाची माहिती

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एलआयसीच्या शेअर्समध्ये सातत्याने घट होत आहे. अदानीचे शेअर्सही घसरले आहेत, तर एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पीएनवीसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्येही लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे आरबीआयनेही याकडे लक्ष केंद्रित केले आहे. बँक नियामक आरबीआयने अदानी प्रकरणात सर्व बँकांकडून अहवाल मागवला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांना किती कर्ज दिले आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे? अशी विचारणा आरबीआयने सर्व बँकांना केली आहे.

प्रकरणाचा सारांश

अमेरिकेतील रिसर्च कंपनी हिडेनबर्गने नुकताच एक रिपोर्ट जारी केलाय. भारतातील अदानी समूहावर या रिपोर्टमध्ये फसवणुकीचे आरोप केले आहेत. ३२ हजार शब्दांच्या या रिपोर्टमध्ये १८८ प्रश्नांचा समावेश आहे. अदानी समूह अनेक दशकांपासून शेअर्समध्ये हेराफेरी आणि खातेधारकांची फसवणूक करत असल्याचा दावा हिडेनबर्गच्या या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

[blockquote content=”अदानी हे पंतप्रधान मोदी यांचे निकटवर्तीय असल्याने ते या मुद्यावर शांत आहेत. अमृतकाळातील हा महाघोटाळा आहे.” pic=”” name=”- संजय सिंह, खासदार, आप”]

[blockquote content=”लोकांचे पैसे काही कंपन्यांना दिले जात आहेत, अशा बातम्यांमुळे कंपनीचे शेअर्स पडले आहेत. आर्थिक दृष्टिकोनातून देशात घडणाऱ्या घटना सभागृहात मांडल्या पाहिजेत. म्हणून आम्ही नोटीस दिली होती. आम्ही जेव्हा जेव्हा नोटीस देतो तेव्हा ती फेटाळली जाते.” pic=”” name=”- मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, कॉंग्रेस”]

[blockquote content=”भाजपाच्या काही नेत्यांना फायदा व्हावा यासाठी एलआयसी आणि राष्ट्रीयीकृत बँकेत जमा असलेल्या पैशांचा वापर केला जात आहे.” pic=”” name=”- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल”]

Web Title: Adani group in maze demand inquiry through jpc supreme court committee 9 parties gave notice in parliament nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 07:57 AM

Topics:  

  • bank notes
  • BJP
  • Congress
  • Gautam Adani
  • narendra modi
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
1

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
2

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक
3

NDAमध्ये सर्व काही आलबेल? JDUच्या ‘सत्ता रहे या ना रहे’ वक्तव्यानंतर CM सम्राट चौधरींनी बोलावली भाजप मंत्र्यांची बैठक

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा
4

Bihar Politics: NDA ची सत्ता जाणार? बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट; नितीश कुमारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.