Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar SIR: राहुल गांधींच्या आरोपानंतर बिहार निवडणुकीबाबत मोठ्या हालचाली; आयोगाची सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती

लोकांना जागरूक करण्यासाठी आयोगाने देशातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत आणि नियमितपणे प्रेस नोट्स जारी केल्या आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 10, 2025 | 01:37 PM
Bihar SIR: राहुल गांधींच्या आरोपानंतर बिहार निवडणुकीबाबत मोठ्या हालचाली; आयोगाची सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती
  • SIR करताना प्रक्रियेदरम्यान कोणत्याही मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही
  • BLA च्या मदतीने आणि स्वतः मतदारांच्या प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांचे नावे मसुदा यादीत पुन्हा समाविष्ट

Bihar SIR:  गेल्या आठवड्यात लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. आयोगावर होणारे मतचोरीचे आरोप आणि बिहार निवडणुकांसाठी सुरू असलेली एसआयआर प्रक्रिया देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.अशातच राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर आता निवडणूक आयोगाच्या गोटातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बिहारमधील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान कोणत्याही मतदाराचे नाव नोटीस जारी केल्याशिवाय मतदार यादीतून वगळले जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे.

१२ ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीपूर्वी आयोगाने दाखल केलेल्या उत्तरात काही महत्त्वाच्या बाबीही सादर कऱण्यात आल्या आहेत. सर्व मतदारांना सुनावणीची आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची पूर्ण संधी दिली जाईल. तसेच, ज्यांची नावे यादीत समाविष्ट करता येणार नाहीत, त्याबाबत कारणासहित लेखी आदेश जारी केला जाईल, असेही आयोगाने नमूद केले आहे. तसेच, सर्व मतदारांना सुनावणीची आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची पूर्ण संधी दिली जाईल, नावे वगळताना कारणासहित लेखी आदेश दिला जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.

Jalgaon Crime :जळगाव पोलिसांची मोठी कारवाई! ४० किलो गांजा जप्त; पोलिसांचा फिल्मीस्टाईल पाठलाग

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील एकूण 7 कोटी 89 लाख मतदारांपैकी 7 कोटी 24 लाख मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तब्बल 65 लाख मतदारांची नावे ड्राफ्ट (मसुदा) यादीत अद्याप समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. या वगळलेल्या मतदारांची सविस्तर माहिती राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल एजंट्स (BLA)ना देण्यात आली आहे. ड्राफ्ट यादीचे प्रकाशन 1 ऑगस्ट रोजी झाले असले, तरी 20 जुलैलाच वगळलेल्या मतदारांची माहिती BLA कडे पोहोचवण्यात आल्याचेही आयोगाने म्हटले आहे. तसेच, वगळलेल्या मतदारांना आयोगाच्या लेखी आदेशाविरोधात दोन स्तरांवर अपील करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही आयोगाने नमूद केलं आहे.

BLA च्या मदतीने आणि स्वतः मतदारांच्या प्रयत्नांमुळे अनेक नागरिकांचे नावे मसुदा यादीत पुन्हा समाविष्ट करण्यात यश आले आहे. जे नागरिक अद्याप यादीतून वगळले गेले आहेत, त्यांनाही पूर्ण संधी दिली जात आहे. कोणताही पात्र मतदार यादीतून वंचित राहू नये, ही आयोगाची स्पष्ट भूमिका आहे. ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत, त्यांना राज्य सरकारच्या यंत्रणेद्वारे ती मिळवण्यासाठी मदत केली जात असल्याचेही आयोगाने सांगितले आहे.

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

लोकांना जागरूक करण्यासाठी आयोगाने देशातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत आणि नियमितपणे प्रेस नोट्स जारी केल्या आहेत. SSV (विशेष सारथी सेवा) मार्फत नागरिकांना जागरूक केले जात असून, बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन माहिती तपासत आहेत. जे नागरिक 1 ऑक्टोबर 2025 रोजी 18 वर्षांचे होणार आहेत, त्यांचे फॉर्म आधीच घेतले जात आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि अन्य असहाय मतदारांना पूर्ण मदत केली जात असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

 

Web Title: After rahul gandhis allegations the commission gives important information to the supreme court regarding bihar elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • election commission of india
  • Rahul Gandhi
  • Supreme Court

संबंधित बातम्या

निवडणूक आयोग अन् राहुल गांधींमध्ये बिनसलं; प्रतिज्ञापत्र मागताच काढतात पळ
1

निवडणूक आयोग अन् राहुल गांधींमध्ये बिनसलं; प्रतिज्ञापत्र मागताच काढतात पळ

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज; दोन्ही गटांचे लक्ष ‘सर्वोच्च’ निर्णयाकडे
2

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज; दोन्ही गटांचे लक्ष ‘सर्वोच्च’ निर्णयाकडे

Rahul Gandhi Push Up: राहुल गांधींना कार्यक्रमाला पोहचले उशीरा; सर्व कार्यकर्त्यांसमोरच मिळाली शिक्षा
3

Rahul Gandhi Push Up: राहुल गांधींना कार्यक्रमाला पोहचले उशीरा; सर्व कार्यकर्त्यांसमोरच मिळाली शिक्षा

Bihar Election 2025: EVM इंटरनेटशी जोडलेला नसतानाही मतदानाचा डेटा निवडणूक आयोगापर्यंत लवकर कसा पोहोचतो?
4

Bihar Election 2025: EVM इंटरनेटशी जोडलेला नसतानाही मतदानाचा डेटा निवडणूक आयोगापर्यंत लवकर कसा पोहोचतो?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.